Akola : अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव

मिनी मंत्रालयासाठी आखाडा रंगणार; राजकीय घडामोडींना वेग
Akola Zilla Parishad
Akola Zilla Parishadsakal

अकोला : मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. त्यामुळे राजकीय घडामोळींना वेग आला असून सर्वच राजकीय पक्षात महिला असल्याने सर्वांनाच संधी मिळणार आहे. परंतु सर्वाधिक सदस्य संख्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे पारडे जड दिसत आहे. परंतु अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी एकाही पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्याने भाजपची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे. सध्या अध्यक्ष, उपाध्यक्षासह दोन सभापती पद वंचितने काबिज केली आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपने मतदानापूर्वीच सभागृहातून बहिर्गमन केले हाेते. त्यामुळे पोटनिवडणुकीपूर्वी इतर विरोधी पक्षांचा पराभव झाला हाेता. नंतरच्या काळात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषदेतील १४ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर नाट्यमयरित्या घडलेल्या घडामोळीत वंचितच्या एकहाती सत्तेला मोठा झटका बसला.

सभापती पदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज चुकल्याने अपक्ष सदस्य सम्राट डोंगरदिवे यांची अविरोध तर प्रहारच्या स्फूर्ती गावंडे यांची महाविकास आघाडीकडून मतदानाच्या आधारे निवड करण्यात आली होती. दरम्यान विद्यमान अध्यक्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना तीन महिन्यांची मुतदवाढ देण्यात आली. सदर मुदत या महिन्यात संपत असल्याने ग्रामविकास विभागाने राज्यातील ३४ जिल्हा परिषदांसाठी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे राजकीय घडामोळींना वेग आला आहे.

भाजप किंगमेकरच्या भूमिकेत

जानेवारी २०२० मध्ये झालेल्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या सात सदस्यांनी मतदानाची प्रक्रिया सुरु हाेण्यापूर्वीच सभागृहातून बहिर्गमन केले हाेते. परिणामी बहुमताचा आकडा ४७ झाला होता. त्यामुळे वंचितचे अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाचे उमेदवार २५ विरूद्ध २१ मतांनी विजयी झाले होते. सभापती पदांच्या निवडणुकीत सुद्धा मतदानादरम्यान भाजप सदस्य गैरहजर राहिल्याने त्याचा फायदा वंचितला झाला होता. परंतु गतवर्षी ऑक्टाेबरमध्ये झालेल्या दाेन सभापती पदांच्या निवडणुकीत महािवकास आघाडीने भाजपच्या मदतीने विजय मिळवला हाेता.

इच्छुकांची स्पर्धा रंगणार

जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. सर्वच राजकीय पक्षांमध्ये महिला असल्याने अध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी इच्छुक महिलांची संख्या अधिक झाली आहे. परंतु वंचितचे पारडे जड असल्याने वंचितमध्येही इच्छुकांची स्पर्धा पाहायला मिळेल.

असे आहे पक्षीय बलाबल पक्ष सदस्य संख्या

वंचित २५

शिवसेना १२

भाजप ०५

कॉंग्रेस ०४

राष्ट्रवादी कॉग्रेस ०४

अपक्ष ०२

प्रहार ०१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com