Akola : जि.प.च्या सभेत सत्ताधारी-विराेधक येणार आमने-सामने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Zilla Parishad

Akola : जि.प.च्या सभेत सत्ताधारी-विराेधक येणार आमने-सामने

अकोला : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा साेमवारी दुपारी १ वाजता आयाेजित करण्यात आली आहे. सभेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवर संघर्ष होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त सभेच्या विषय पत्रिकेवरील विषयांवर सुद्धा सत्ताधारी व विरोधकांमध्ये घमासान होण्‍याची शक्यता आहे.

आर्थिक वर्ष सुरू हाेऊन पाच महिन्यांचा कालावधी झाला आहे. परंतु त्यानंतर सुद्धा जिल्हा परिषदेच्या अनेक याेजना रखडल्या आहेत. जिल्हा नियाेजन समितीच्या निवडणुकीनंतर प्रथमच १९ सप्टेंबर राेजी सर्वसाधारण सभा हाेणार आहे. सभेच्या विषय सूचीवर एकूण दहा विषयांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये यापूर्वी २१ जून राेजीच्या सभेचे इतिवृत्त कायम करण्यासह अन्य विषयांचा सामवेश आहे.

शिकस्त वर्ग खाेल्या पाढण्यास परवानगी देणे. शिकस्त झालेले बांधकाम विभागाचे बाळापूरचे उपविभाग कार्यालय पाडणे. लाेणाग्रा फाटा ते मालवाडा फाटा रस्त्याला दर्जा देणे. पाथर्डी प्राथमिक आराेग्य केंद्राच्या कामाची निविदा स्वीकृत करणे. हाता येथील प्राथमिक आराेग्य केंद्राच्या कामाची निविदा स्वीकृत करणे. समाज कल्याण विभागाच्या दुधाळ जनावरांच्या याेजनेला मान्यता देणे इत्यादी विषयांसह अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

निविदा स्वीकृतीच्या ठराव मंजुरीसाठी

उरळ बु. ते उरळ ख. पानखास नदीवरीूल जुन्या पुलायेवजी त्याच ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम करण्याच्या निविदेला स्वीकृत देण्याच्या ठराव सभेत मांडण्यात येणार आहे. पाटबंधारे विभागाच्या १६ जून २०२१ च्या पत्रानुसार पुलाच्या कामासाठी ९५ लाख ४७ हजार मंजूर करण्यात आला. प्रशासकीय मान्यतेचा ठराव २४ फेब्रुवारी २०२२ राेजीच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाला. मार्च ते जुलैपर्यंत केवळ तांत्रिक मान्यता, डिझाईन तयार करण्यात आले. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. जरम्यान आता ही स्वीकृतीसाठी सभेत ठेवण्यात येईल. निधी प्राप्त झाल्यानंतरही १५ महिन्यांनीही काम सुरू झालेले नसल्याने या दिरंगाईला जबाबदार काेण असा सवाल उपस्थित हाेत आहे.

Web Title: Akola Zilla Parishad Ruling Party Opposition Party Meeting On Various Issues

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..