Akola : शाळेच्या इमारती बनल्या धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola zilla parishad school building construction damage

Akola : शाळेच्या इमारती बनल्या धोकादायक

रिसोड : रिसोड तालुक्यातील अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. रिसोड तालुक्यातील वा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पिंप्री सरहद्द येथील जिल्हा परिषद शाळेची दुर्दशा झाली आहे. सदर गावाला १ ते ७ पर्यंतचे वर्ग आहेत. परंतु भेगा पडलेल्या भिंती, फुटलेले पत्रे त्यातही सात वर्गासाठी फक्त तीन वर्ग खोल्या, अन ७ वर्गांसाठी चारच शिक्षक, यामुळे विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने घटते आहे.

एका शिक्षकाची जागा असून देखील शिक्षण विभागाने येथे शिक्षक रुजू केला नाही. शिक्षकाची संख्या कमी असल्याने असलेल्या शिक्षकांना देखील मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या वयात विद्यार्थ्यांना योग्य असलेले शिक्षण मिळत नसल्याने शिक्षणाचा दर्जा देखील दिवसेंदिवस कमी होत आहे. या समस्येला कंटाळून नागरिक आपल्या पाल्यांना खाजगी शाळेत टाकत आहेत. मात्र हलाखीची परिस्थिती असणाऱ्या नागरिकांना आर्थिक अडचणीमुळे मुलांना दर्जाहीन शिक्षण द्यावे लागत आहे. यामुळे येणाऱ्या काळात पिंप्री येथील जिल्हा परिषद शाळा ही इतिहासात जमा होते की काय? अशी चिंता व्यक्त होत आहे.

एकीकडे अनेक जिल्हा परिषद शाळा ह्या डिजिटल होत चालल्या आहेत. शाळांना लाखो रुपयांचा निधी उपलब्ध होत आहे. मात्र या शाळेची बिकट अवस्था असून फक्त थातूरमातूर दुरुस्ती करून लाखोंचे बिल काढले जात आहेत. सदर शाळेत मोडकळीला आलेल्या वर्गखोल्या, विजेचा अभाव, ना पंखे, ना संगणक, तसेच डिजिटल शिक्षणासाठी कोणतीही सोय नसणे, या कारणामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. शिक्षण विभागाने या चिमुकल्यांना दर्जेदार शिक्षणासाठी मूलभूत सुविधांसह शिक्षक उपलब्ध करून द्यावा, तसेच शाळा डिजिटल करण्यासाठी निधी उपलब्ध करावा. यामुळे जिल्हा परिषद शाळेचे महत्त्व टिकून राहील, अशा भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

रिसोड तालुक्यातील नावली ही शाळा ३६५ दिवस चालणारी शाळा आहे. त्या ठिकाणी हाउसफुलचे बोर्ड सुद्धा लावावे लागताते. वर्गखोल्या उपलब्ध नसल्यामुळे अनेक वर्ग हे नावली येथील मंदिरामध्ये भरतात तर काही वर्ग हे समाज मंदिरात सुद्धा भरत असतात. केवळ वर्ग खोल्या नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. नावली येथे शाळा ही सकाळ आणि दुपार या दोन शिफ्ट मध्ये घ्यावी लागते. विद्यार्थ्यांची पटसंख्या घसरण्याची हीच बाब असून याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नवीन वर्ग खोल्या उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी नावली येथील नागरिकांनी केली आहे.

नावली जिल्हा परिषद शाळेचे नाव केवळ संपूर्ण राज्यांमध्ये गाजलेले आहे. नावली येथील शाळेचे शिक्षक गावकरी यांचे सहकार्य असल्याने हाउसफुलचे बोर्ड नावली या शाळेला लावावे लागतात, ही अभिमानाची बाब आहे

- गजाननराव बाजड, मा. सरपंच नावली

रिसोड तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळा मोडकळीला आल्या असून याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने हा मुद्दा लावून धरून नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा.

- गजानन खंदारे, शाळा बचाव समिती रिसोड

Web Title: Akola Zilla Parishad School Building Construction Damage Education Department

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..