बापरे! जिल्हा परिषदेचे सहा अधिकारी, कर्मचारी क्वारंटाईन

सुगत खाडे  
Saturday, 29 August 2020

जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने पुन्हा एकदा जिल्हा परिषदेत शिरकाव केला आहे. आरोग्य विभागात कार्यरत एक कर्मचारी गुरुवारी (ता. २७) कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे त्याच कक्षात कार्यरत तीन डाटाएंट्री ऑपरेटर व तीन वैद्यकीय अधिकारी होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत.

अकोला  ः जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने पुन्हा एकदा जिल्हा परिषदेत शिरकाव केला आहे. आरोग्य विभागात कार्यरत एक कर्मचारी गुरुवारी (ता. २७) कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे त्याच कक्षात कार्यरत तीन डाटाएंट्री ऑपरेटर व तीन वैद्यकीय अधिकारी होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत.

त्यासोबतच जि.प.च्या आरोग्य विभागातील संबंधित कक्षाचे निर्जंतुकीकरण करुन त्यास बंद करण्यात आले आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

कोरोना विषाणूने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. महानगरातून शहर व आता गाव खेड्यात पोहचलेल्या कोरोनाने शासकीय कार्यालयात सुद्धा शिरकाव करण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतीभा भोजने यांच्या कक्षात कार्यरत शिपायालाच कोरोनाची लागन झाल्याची बाब २३ जुलैरोजी घडली होती.

त्यानंतर जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यासह प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बाहेरील नागरिकांना जिल्हा परिषदेत प्रवेशबंदी सुद्धा करण्यात आली होती.

दरम्यान १८ ऑगस्टरोजी पुन्हा एकदा जिल्हा परिषदेतील कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर गुरुवारी (ता. २७) सुद्धा एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे संबंधित कक्षातील तीन वैद्यकीय अधिकारी, तीन डाटाएंट्री ऑपरेटर यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Zilla Parishad six officers, staff quarantine