Akola : २२१ शिक्षक स्वगृही परतले; २१ जिल्ह्याबाहेर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola zilla parishad teachers transfer

Akola : २२१ शिक्षक स्वगृही परतले; २१ जिल्ह्याबाहेर

अकोला : गत दोन वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्या यावर्षी करण्यात आल्या. बदल्यांमध्ये जिल्ह्यात २२१ शिक्षक नवीन आले, तर १७ शिक्षक हे जिल्ह्याबाहेर गेले आहेत. संबंधित शिक्षक लवकरच रुजू होणार असल्याने ज्या शाळांमध्ये शिक्षक नाहीत त्या ठिकाणी शिक्षक उपलब्ध होतील.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या बदल्यांना स्थगिती दिली होती. त्यामुळे दोन वर्षे शिक्षकांच्या बदल्या रखडल्या होत्या. अखेर शिक्षण विभागाकडून या वर्षी आंतरजिल्हा बदलीसाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली. कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय शिक्षकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे व बदल्यातील निकष लक्षात घेऊन ऑनलाईन पद्धतीने बदलीची प्रक्रिया पार पडली.

बदली प्रक्रियेत अकोला जिल्हा परिषदेतील १७ शिक्षक हे जिल्ह्याबाहेर गेले, तर २२१ शिक्षकांचे जिल्ह्यात परजिल्ह्यातून जिल्ह्यात आगमण झाले. गत काही वर्षांपासून शिक्षक भरती प्रक्रिया बंद असल्याने शाळांमध्ये हजारो शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिवाय याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत होता. परंतु आता आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमुळे जिल्ह्याला २२१ नवे शिक्षक मिळाल्याने शिक्षकांच्या रिक्त पदांचा अनुशेष हा काही प्रमाणात भरून निघणार आहे.

२२१ पैकी एक रुजू

आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत २२१ शिक्षक स्वगृही परतले असून यापैकी सर्व कागदपत्रांची पडताळणी करून एकच शिक्षक जिल्ह्यात रुजू झाले आहेत. उर्वरित २२० शिक्षक लवकरच रुजू होणार असल्याची माहिती आहे.

१७ शिक्षकांचा मार्ग मोकळा

परजिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांची चार-पाच वर्षे सेवा झाली की त्यांची नियुक्तीच्या ठिकाणी राहण्याची मानसिकता होते. त्यामुळे जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीसाठी फार कमी शिक्षक उत्सुक असतात. याच कारणामुळे यंदा केवळ १७ शिक्षक यंदा आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून स्वगृही गेले. संबंधित शिक्षकांना गुरुवारी (ता. १) कार्यमुक्त करण्याचे आदेश सीईओंनी जारी केले.

Web Title: Akola Zilla Parishad Teachers Transfer Education Students

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..