esakal | ..आणि बहिणींची इच्छा अपूर्णच राहिली, भावावर काळाचा घाला; अपघातात अकाळी मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Akola..and the wishes of the sisters remained unfulfilled, put time on the brother; Premature death in an accident

रक्षाबंधन अर्थात राखी पौर्णिमेच्या एक दिवस आधीच राहुलच्या अकाळी मृत्यूमुळे प्रत्येक वर्षी त्याला राखी बांधून ओवाळणाऱ्या बहिणींवर नियतीनेच वज्राघात केला. त्यामुळे भावाला राखी बांधण्याची राहुलच्या बहिणींची इच्छा अपूर्णच राहिली.

..आणि बहिणींची इच्छा अपूर्णच राहिली, भावावर काळाचा घाला; अपघातात अकाळी मृत्यू

sakal_logo
By
सुगत खाडे

अकोला  ः जुने शहरातील शिवनगर परिसर रहिवाशी चार जणांचा रविवारी (ता. २) खामगाव जवळ वाहन दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यामध्ये राहुल सातळे या ३९ वर्षीय युवकाचा सुद्धा समावेश होता.

दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ व घरातील एकमेक कर्ता पुरूष असलेला राहुल या अपघातात मृत्यू पावल्याने सातळे कुटुंबियांसह इतर तीन कुटुंबियांवर शोककळा पसरली.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

रक्षाबंधन अर्थात राखी पौर्णिमेच्या एक दिवस आधीच राहुलच्या अकाळी मृत्यूमुळे प्रत्येक वर्षी त्याला राखी बांधून ओवाळणाऱ्या बहिणींवर नियतीनेच वज्राघात केला. त्यामुळे भावाला राखी बांधण्याची राहुलच्या बहिणींची इच्छा अपूर्णच राहिली.

‘रक्षाबंधन’ हा बहिण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा सण. भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला समर्पित या सणाला बहिण आपल्या भावाच्या मनगटावर प्रेमाचं आणि रक्षणाचं प्रतिक अशी राखी बांधते.

त्यासोबतच भावाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी बहिण मागणं मागते आणि एकमेकांना गिफ्ट देऊन सणाचा आनंद द्विगुणीत होतो. प्रत्येक बहिण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असते. परंतु या दिवसाच्या पूर्वसंध्येला रविवारी (ता. ३) जुने शहरातील शिवनगर रहिवाशी चार जणाचा अपघाती मृत्यू झाला.

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव जवळील कोलोरी गावानजिक गव्हाण फाट्‍याजवळ एका कंटेनरने मारलेल्या धडकेमुळे शिवनगर रहिवाशी विनोद शंकरराव बावणे (वय ५०), पप्पू मनोहर जोशी (वय ४५), अतुल शंकरराव व्यवहारे (वय ४७), राहुल सातळे (वय ३९) यांचा मृत्यू झाला.

त्यामुळे एकाच वेळी चार कुटुंबांवर शोककळा पसरली. या चार मृतकांपैकी राहुल सातळे हा त्याच्या परिवारित कर्ता पुरूष होता. घरातील कर्ता व एकुलता एक पुरूष असल्याने बहिणींचा लाडका असलेला राहुल राखी पौर्णिमेच्या एक दिवस आधीच काळाच्या पडद्याआड गेल्याने रक्षाबंधनला भावाला ओवाळण्याची व राखी बांधण्याची त्याचा बहिणींची इच्छा अपूर्ण राहिली.
 
आधी हरवले वडिलांचे छत्र आणि आता...
राहुल सातळे याला फोटोग्राफीचा छंद होता. सदर छंदाचे व्यवसायात रुपांतर करुन तो अर्थाजन करीत असे. हृदय विकाराचा झटका लागून वडिलांचे ७-८ वर्षापूर्वी निधन झाल्यानंतर राहुल वरच घरची सर्व जबाबदारी होती. वृद्ध आईसह पत्नी व दोन लहान मुलींची जबाबदारी राहुलच्या खांद्यावर होती. त्यासह राहुल हा शिवनगर परिसरातील रहिवाशी बहिण आरती ताठे व जळगाव जिल्ह्यातील पाचोरा रहिवाशी दुसरी बहिण भारती यांना सुद्धा मदत करत असे. परंतु वडिलांच्या मृत्यूनंतर त्याच्या बहिणीवरून काळाने भावाचे छत्र सुद्धा हिरावून घेतले.
(संपादन - विवेक मेतकर)

loading image
go to top