Akola News: अकोट ग्रामीण पोलिसांच्या कारवाईत अवैध दारू विक्रीवर मोठा हल्ला; लाखभर मुद्देमाल जप्त
Overview of the Illegal Liquor Seizure in Akot: अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनच्या कारवाईत पाच ठिकाणी अवैध देशी व हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यांकडून एक लाख चार हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार पाच आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला.
अकोट: अकोट ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील पाच वेगवेगळ्या ठिकाणी शुक्रवारी (ता. ३) झालेल्या कारवाईत, अवैध देशी व हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या इसमांकडून एक लाख चार हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.