Akot Farmer : अकोटात वळवाच्या पावसाने खरिपाची पेरभरणी; ५८.९ मिमी पावसाची नोंद, खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग

Pre Monsoon 2025 : अकोट तालुक्यात वळवाच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून, सर्व महसूल मंडळात समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाली आहे. शेतकऱ्यांनी खरीप पेरणीपूर्व मशागत सुरू केली असून, मॉन्सून नियमित झाल्यास चांगले उत्पादन अपेक्षित आहे.
Akot Farmer
Akot Farmer sakal
Updated on

अकोट : तालुक्यात वळवाच्या पावसाने आठही महसूल मंडळात भक्कम हजेरी लावली आहे. गेल्या काही आठवड्यात संपूर्ण मंडळात मिळून तालुक्यात सरासरी ५८.९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या समाधानकारक वातावरणामुळे व पेरणीयोग्य वापसे निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची तयारी सुरू केली आहे. कृषी विभागानेही खरीप पेरणी क्षेत्र वाढण्यासाठी विविध उपाययोजनांवर भर दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com