Akot News: अकोट वन्यजीव विभागात २३ वाघ व आठ बिबटे; पाच वनपरिक्षेत्रात २०३९ प्राण्यांची नोंद; धारगड परीक्षेत्रात सर्वाधिक १३ वाघ

Akot Wildlife Department Animal Census Highlights: अकोट वन्यजीव विभागात २३ वाघ, आठ बिबटे; धारगड परीक्षेत्रात सर्वाधिक १३ वाघ. पाच वनपरिक्षेत्रात २०३९ प्राण्यांची गणना, निसर्ग अनुभव कार्यक्रमात पर्यटकांचा सहभाग.
Akot News

Akot News

esakal

Updated on

अकोट: एक्क्यांशी हजार १९२ हेक्टरवर पसरलेल्या आणि वनश्रीमंत असलेल्या अकोट वन्यजीव विभागातील पाच वनपरिक्षेत्रात बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात झालेल्या प्राणी गणनेत धारगड परिक्षेत्रात सर्वाधिक १३ वाघ, तर सोनाळा परिक्षेत्रात दोन बिबटचे निसर्गप्रेमींना दर्शन झाल्याची माहिती उपवनसंरक्षक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अकोट वन्यजीव विभाग यांनी दिली आहे.

बुद्ध पौर्णिमेला शुभ्र प्रकाशात ‘निसर्ग अनुभव’ कार्यक्रम पार पडला. यामध्ये राज्यासह परराज्यातून एकूण ५८ पर्यटकांनी सहभाग नोंदविण्याची माहिती आहे. दरम्यान गणनेवेळी व्हीआयपी दर्शनाने अनेकांच्या अपेक्षावर विरजण पडले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com