भविष्यात शिवसेनेशी युती होऊ शकते; प्रकाश आंबेडकरांचे सूचक वक्तव्य

आंबेडकरांच्या या विधानानंतर राज्यात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
मुख्यमंत्री ठाकरे-प्रकाश आंबेडकर
मुख्यमंत्री ठाकरे-प्रकाश आंबेडकर सकाळ

अकोला : आगामी काळातील निवडणुकांचे पडधम राज्यात वाजू लागलेले असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एक मोठे विधान केले आहे. भविष्यात शिवशक्ती- भीमशक्ती समीकरणासाठी साद घातली जाऊ शकते असे सूचक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. त्यांच्या या विधानानंतर राज्यात अनेक चर्चांना उधाण आले आहे. ते अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. (Prakash Ambedkar On Shivsena Alliance)

मुख्यमंत्री ठाकरे-प्रकाश आंबेडकर
मोठी बातमी : नवाब मलिक यांची संपत्ती ईडीकडून जप्त

दरम्यान, युतीसाठी आपण एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भेटलो होतो. मात्र, ही चर्चा पुढे गेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यानंतरही वंचित बहुजन आघाडी राज्यात शिवसेनेसोबत (Shivsena) युती करण्यास सकारात्मक असल्याचे ते म्हणाले. आघाडीबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, आपल्यासोबत कुणीच लग्न करायला तयार नाही मात्र, फिरवायला सर्वच तयार असल्याची खंतदेखील आंबेडकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

सध्या काँग्रेससोबत (Congress) आघाडीची चर्चा पुढे जात नसल्याने मैत्रीसाठी सेनेला चुचकारलं असून, आंबेडकरांच्या या भूमिकेनंतर आंबेडकर यांनी शिवसेनेला शिवशक्ती-भीमशक्ती समीकरणाची साद घातल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून, भविष्यात खरंच शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मुख्यमंत्री ठाकरे-प्रकाश आंबेडकर
कोर्टाचा सोमय्यांना दिलासा, मात्र सलग चारदिवस हजर राहण्याचे आदेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्वर ओक या बंगल्यावरील एसटी कर्मचाऱ्यांचा (ST Worker) हल्ला पूर्व नियोजित होता. याबाबत गुप्तचर यंत्रणांनी (IB) हल्ल्याची पूर्व सूचना दिल्यानंतरही कायदा व सुव्यवस्था बघणारे मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nagare Patil) यांनी माहिती लपविली. त्यामुळे त्यांना निलंबित करून चौकशी करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com