मोठी बातमी : नवाब मलिक यांची संपत्ती ईडीकडून जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Property of Nawab Malik confiscated from ED

मोठी बातमी : नवाब मलिक यांची संपत्ती ईडीकडून जप्त

मुंबई : राज्याचे माजी अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना पुन्हा एक झटका बसला आहे. ईडीने (ED) नवाब मलिक याची संपत्ती बुधवारी (ता. १३) जप्त केली. ईडीकडून नवाब मलिकांच्या आठ मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. मनी लॉंड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. नवाब मलिक सद्या न्यायालयीन कोठडीत आहे. (Property of Nawab Malik confiscated from ED)

नबाव मलिक यांना आधी जमीन खरेदी प्रकरणात ईडीने अटक केली होती. आता नवाब मलिक (Nawab Malik) यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ माजली आहे. एकूणच महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडी कारवाई करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुखनंतर नवाब मलिक तुरुंगात आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने कारवाई करीत गोवावाला कंम्पाउंडमधील संपत्ती जप्त केली आहे. तसेच उस्मानाबादेतील १४८ एकर जमीनही जप्त केली. कुर्ल्यातील तीन फ्लॅट्स ईडीकडून जप्त करण्यात आले आहेत. कुर्ला पश्चिमेतील व्यावसायिक जागा, कुर्ल्यातील गोवावाला कम्पाऊंड, वांद्रे पश्चिमेतील दोन फ्लॅट्स व मुंबईतील पाच फ्लॅट ईडीने ताब्यात (Property confiscated) घेतले आहे. ईडीने प्रेसनोट जारी करीत कारवाईची माहिती दिली आहे.

हेही वाचा: नरेंद्र मोदी म्हणाले, भारत जगाला पोसण्यासाठी तयार; पण...

मंगळवारीच इक्बाल कासकरच्या निकटवर्तीच्या एका महिलेचा ठाण्यातील ५५ लाखांचा फ्लॅट ईडीने जप्त केला होता. त्यानंतर आज नवाब मलिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर असणाऱ्या मालमत्ता ईडीने जप्त केल्या आहेत. नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आर्थिक गैरव्यव्हार करून संबंधित संपत्ती मिळवली आहे. डॉन दाऊद इब्राहिम यांची बहीण हसीना पारकर यांच्याकडून ही संपत्ती (Property confiscated) घेतल्याचे बोलले जात आहे. त्याच आरोपाखाली नवाब मलिक यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांनी ईडी (ED) कारवाई विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

नवाब मलिकांना २३ फेब्रुवारी रोजी अटक

ईडीने (ED) कारवाई करीत नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. मात्र, अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करीत नवाब मलिक यांनी हायकोर्टात आव्हान दिले होते. आपली तात्काळ सुटका करावी, अशी मागणी करणारी फौजदारी याचिका नवाब मलिक यांनी दाखल केली होती. हायकोर्टातही दिलासा न मिळाल्याने नवाब मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे.

Web Title: Property Of Nawab Malik Confiscated From Ed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :nawab malik
go to top