

Clarification Meeting Called by Deputy Chairperson Neelam Gorhe
Sakal
अकोला : भीक मागण्यास प्रतिबंध घालणाऱ्या विधेयकावर विधानमंडळात चर्चा सुरू असताना, आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर दिले असले तरी, उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे समाधान झाले नाही. या संदर्भात अधिक स्पष्टीकरण मिळावे यासाठी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक त्यांच्या दालनामध्ये आयोजित केली आहे.