

Akola
esakal
अकोला: ओडिशा आणि गुजरातदरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी, विशेषतः कामगार, व्यापारी, विद्यार्थी आणि भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रवाशांची वाढती गर्दी आणि सातत्याने होत असलेली मागणी लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने ‘ब्रह्मपूर–सुरत (उधना) अमृत भारत एक्सप्रेस’ ही गाडी आता दैनिक करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ओडिशातील जगन्नाथ पुरीसह विविध धार्मिक स्थळांना जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार असून, आता या मार्गावर अधिक चांगली रेल्वे सुविधा उपलब्ध होणार आहे.