esakal | कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; ११ नवे पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; ११ नवे पॉझिटिव्ह

कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; ११ नवे पॉझिटिव्ह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोनामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त आणखी एका रुग्णाचा उपचार घेताना मृत्यू झाला. त्यासोबतच ११ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे सध्या जिल्ह्यात ५३ ॲक्टिव्ह रुग्ण असून आतापर्यंत १ हजार १३२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Another death due to corona; 11 new positives)

कोरोना संसर्ग तपासणीचे बुधवारी (ता. १४) ८५४ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ८४९ अहवाल निगेटिव्ह तर आरटीपीसीआरच्या चाचणी ५ अहवाल पॉझिटिव्ह आले. रॅपिडच्या चाचणीत सहा पॉझिटिव्ह आल्याने नव्या रुग्णांची संख्या ११ झाली. त्यासोबतच मृत्यूमुखी पडलेला रुग्ण बोरवाकली, अकोला येथील ३२ वर्षीय पुरुष होता. या रुग्णास १३ जुलै रोजी दाखल केले होते. दोन रुग्णांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला.

हेही वाचा: कोरोनापासून दिलासा; मृत्यूसह ॲक्टिव्ह रुग्ण घटलेकोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ५७७०८
- मयत - ११३२
- डिस्चार्ज - ५६५२३
- ॲक्टिव्ह रुग्ण - ५३

Another death due to corona; 11 new positives

loading image