esakal | कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; सात नवे पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; सात नवे पॉझिटिव्ह

कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; सात नवे पॉझिटिव्ह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोनामुळे सोमवारी (ता. ५) आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यासोबतच सात नवे रुग्ण आढळले. याव्यतिरिक्त २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे सध्या जिल्ह्या २३१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. (Another death due to corona; Seven new positives)

कोरोना संसर्गा तपासणीचे सोमवारी जिल्ह्यात १३९ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १३७ अहवाल निगेटिव्ह तर दोन अहवाल पॉझिटिव्ह आले. रॅपिडच्या चाचणीत पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णांमध्ये सात नव्या रुग्णांची भर पडली. त्यासोबतच एका रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण तेल्हारा येथील ५८ वर्षीय पुरुष असून या रुग्णास २७ जून रोजी दाखल केले होते. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बळींची संख्या १ हजरा १२९ झाली आहे.

हेही वाचा: पोटनिवडणुकीसाठी इच्छुकांनी कसली कंबरकोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ५७६३७
- मयत - ११२९
- डिस्चार्ज - ५६२७७
- ॲक्टिव्ह रुग्ण - २३१

संपादन - विवेक मेतकर

Another death due to corona; Seven new positives

loading image