esakal | पोटनिवडणुकीसाठी इच्छुकांनी कसली कंबर
sakal

बोलून बातमी शोधा

पोटनिवडणुकीसाठी इच्छुकांनी कसली कंबर

पोटनिवडणुकीसाठी इच्छुकांनी कसली कंबर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


रिसोड ः आरक्षणाच्या मुद्यावर न्यायालयाने जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील इतर मागारवर्गीयांतील १४ जणांचे आरक्षण रद्द केल्यामुळे जिल्ह्यात निवडणूक आयोगाने पोट निवडणुकीचा कारर्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे तालुक्यातील भर जहागीर जिल्हा परिषद सर्कल व मोप गणातील पोट निवडणूक होत आहे. त्याअनुषंगाने इच्छुकांनी कंबर कसली असून, पक्षांच्या युती, आघाडी आधीच इच्छुकांनी मतदारांशी भेटींवर जोर दिला होता. त्यामुळे निवडणुकीचा पावसाळ्यात चांगलाच जोर धरला असल्याचे दिसून येत आहे. (Aspirants begin preparations for by-elections)

हेही वाचा: कोव्हिशिल्ड लसींचे डोस उपलब्ध नसल्याने लसीकरणात खोळंबा

भर जहागीर जिल्हा परिषद सर्कलमध्ये गत वेळी वंचितने बाजी मारली होती. त्यांच्या प्रतिस्पर्धी काँँग्रेसच्या उमेदवाराचा अवघ्या दोन मताच्या फरकाने निसटता विजय झाला होता. जनविकास आघाडी तिसऱ्या क्रमांकावर होता. कोरोना काळाच्या दीड वर्षात पाहिजे तसा विकास झाला असल्याचे दिसत नाही. गावातील पाणंद रस्ते, मोरगव्हाणवाडी रस्ता, मोप ते बोरखेडी रस्ता, गणेशपूर ते रिसोड रस्ता, भर जहागीर ते मोरगव्हाण सिंचन तलाव रस्त्य्याच्या समस्या आघाडीवरच आहेत.

हेही वाचा: दोन सभापतींसह १४ सदस्यांना पुन्हा जिल्हा परिषदेचे वेध

त्यामुळे सर्व विकास कामांचा अजेंडा परत इच्छुक उमेदवारांना प्रचारामध्ये घेऊन निवडणूक प्रचाराला सामोरे जावे लागणार आहे. भर जहागीर जिल्हा परिषद सर्कलमधील मोरगव्हाणवाडी, चाकोली, कन्हेरी, मोप, बोर, खेडी, शेलुखडशे, गणेशपूर पाचांबा, मांगवाडी आदी गावांचा समावेश असून सर्कलमध्ये १४ हजार ६९५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

संपादन - विवेक मेतकर

Aspirants begin preparations for by-elections

loading image
go to top