esakal | आतापर्यंत दीड कोटीवर लसीकरण, आणखी मिळाला 75 हजार लसींचा डोज
sakal

बोलून बातमी शोधा

आतापर्यंत दीड कोटीवर लसीकरण, आणखी मिळाला 75 हजार लसींचा डोज

आतापर्यंत दीड कोटीवर लसीकरण, आणखी मिळाला 75 हजार लसींचा डोज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोना विषाणू संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपविण्याच्या उद्देशाने कोविड लसीकरणाला गती देण्याचा प्रयत्न सरकारकडून होतो आहे. त्यासाठी अकोला आरोग्य मंडळात येणाऱ्या अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांसाठी गुरुवारी एकूण ७५ हजार ५०० डोज प्राप्त झाले आहेत. त्यातून पाच जिल्ह्यात लसीकरण्याची मोहीम सुरळीत सुरू ठेवण्यास मदत होणार आहे. (So far over one and a half crore vaccinations, another dose of 75 thousand vaccines)


गत काही दिवसांपासून लस उपलब्ध नसल्यामुळे काही ठिकाणी लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले होते. मात्र, आता पाच जिल्ह्यांसाठी ७५ हजार ५०० नवीन डोज उपलब्ध झाल्याने लसीकरणाला गती मिळणार आहे. अकोला आरोग्य मंडळात अकोल्यासह बुलडाणा, वाशीम, अमरावती, यवतमाळ या अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. या पाचही जिल्ह्‍यांना लसीचे डोज गुरुवारी वितरित करण्यात आले.

जिल्हानिहाय प्राप्त डोज
अकोला ः १२ हजार ५००
बुलडाणा ः २१ हजार
वाशीम ः सात हजार ७००
अमरावती ः १९ हजार ६००
यवतमाळ ः१५ हजार
एकूण ः ७५ हजार ५००

आतापर्यंत दीड कोटी नागरिकांचे लसीकरण
अकोला आरोग्य मंडळांतर्गत येणाऱ्या अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात सोमवार, ता. ५ जुलैपर्यंत एकूण एक कोटी ५५ लाख २१ हजार १०६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्यात पहिला व दुसरा डोज घेणाऱ्यांचा समावेश आहे. अकोला जिल्ह्यात २४ लाख ४२ हजार ५४४ नागरिकांचे लसीकरण सोमवारपर्यंत झाले. अमरावती जिल्ह्यात ३९ लाख ३९ हजार २२६, बुलडाणा जिल्ह्यात ३६ लाख ७१ हजार २२८, वाशीम जिल्ह्यात १६ लाख दोन हजार ७५७, यवतमाळ जिल्ह्यात ३८ लाख ६५ हजार ३५१ असे एकूण पाचही जिल्ह्यात एक कोटी ५५ लाख २१ हजार १०६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.


So far over one and a half crore vaccinations, another dose of 75 thousand vaccines

loading image