
नागपूर : अकोला लोकसभा मतदारसंघातील भाजपचे नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे यांच्या निवडीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले. उच्च न्यायालयाने धोत्रे यांना नोटीस बजावत २ जानेवारीपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. उमरदारी (जामुना, ता. बार्शीटाकळी) येथील मतदार गोपाल चव्हाण यांनी ही याचिका दाखल केली.