Akola : आर्थिक मदतीसाठी २५ जानेवारीपर्यंत अर्ज करा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nima arora
अकोला : आर्थिक मदतीसाठी २५ जानेवारीपर्यंत अर्ज करा!

अकोला : आर्थिक मदतीसाठी २५ जानेवारीपर्यंत अर्ज करा!

अकोला : कोविड-१९ च्या प्रार्दुभावामुळे(covid update) संचारबंदीच्या कालावधीत कलाकारांना(curfew) उत्पन्नापासून वंचित राहावे लागले. कलावंताना आर्थिक मदत व्हावी याकरीता शासनाद्वारे आर्थिक पॅकेज (Financial package)जाहीर केले आहे. या आर्थिक मदतीचा लाभ घेण्याकरीता जिल्ह्यातील कलाकार लाभार्थ्यांनी परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रासह मंगळवार २५ जानेवारीपर्यंत करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.(collector nima arora)

हेही वाचा: साइड दिली नाही म्हणून दोघा भावांना मारहाण; तर विनवण्या करणाऱ्या आईलाही मारले 

कोविड प्रार्दुभावामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, सादरिकरण व त्‍यातून येणाऱ्या उत्‍पन्‍नापासून कलावंताना वंचित राहावे लागले. तसेच सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित करण्‍यात येणारे कार्यक्रमही या काळात स्‍थगित करण्‍यात आले. त्यामुळे उपजिविकेचे साधन, सांस्कृतिक कार्यक्रम व कला सादर असल्याने कलावंताना आर्थिक अडचणीना सामोर जावे लागले. कलावंताना आर्थिक दिलासा पॅकेज देण्‍याचा निर्णय राज्‍य सरकारने घेतला असून राज्‍यातील कलावंतासाठी ३५ कोटी रूपयांची तरतूद करण्‍यात आली आहे. प्रतिकलाकार पाच हजार रुपये एकरकमी अनुदान देण्‍यात येणार आहे. याकरीता कलावंतानी समाज कल्‍याण विभागाकडे अर्ज करावा. योजनेचा विहित नमुन्‍यातील अर्ज जिल्हा परिषदेच्या समाज कल्‍याण विभाग येथे तसेच संकेतस्‍थळावर वर उपलब्‍ध आहे. तरी जिल्ह्यातील कलाकार लाभार्थ्यांनी मंगळवार २५ जानेवारीपर्यंत जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग, अकोला येथे आवश्यक कागदपत्रासह करावा.

पात्रता व निकष

प्रयोगात्‍मक कलेतील केवळ कलेवर उपजीविका असणारे आर्थिक दृष्ट्या दुर्बल(Financially weak artist ) कलाकार यासाठी पात्र राहतील, महाराष्ट्रात १५ वर्ष वास्‍तव्‍य असावे, कलेच्‍या क्षेत्रात १५ वर्ष कार्यरत, वार्षिक उत्‍पन्‍न (Annual income )४८ हजार रूपयांच्‍या कमाल मर्यादित असणे आवश्‍यक आहे. केंद्र शासन व राज्‍य शासनाच्‍या(central and state government) जेष्‍ठ कलाकार मानधन घेणाऱ्या लाभार्थी कलाकारांना इतर वैयक्तीक शासकीय अर्थसाहाय्यच्या योजनांचा लाभ घेणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top