Akola : डांबर लिक्विड टाकीला आग; दोघांचा होरपळून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डांबर लिक्विड टाकीला आग; दोघांचा होरपळून मृत्यू

डांबर लिक्विड टाकीला आग; दोघांचा होरपळून मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बाळापूर : डांबरच्या लिक्विड टाकीचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत दोः जण होरपळून मृत्यू झाला आहे. तर, तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील रिधोरा नजीक असलेल्या ईगल इन्फ्रा कंपनीच्या प्लांट मध्ये आज बुधवारी सायंकाळी घडली. संजय पवार व आतिफ खान असे मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर मुशीर अहेमद रा. पारस या कामगारांसह तीघांवर सर्वोपचार मध्ये उपचार सुरू आहेत.

राष्ट्रीय महामार्गावरील रिधोरा नजीक ईगल कंपनीचा प्लांट आहे. राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचा कंत्राट या कंपनीकडे आहे. सायंकाळच्या सुमारास डांबरच्या लिक्विडने भरलेल्या टाकीचे काम सुरू होते. या टाकीला गळती लागल्याने वेल्डिंगचे काम सुरू होते. मृतक व अन्य तीघे असे पाच जण हे काम करीत होते. वेल्डिंगमुळे स्पार्कींग झाल्याने खुप मोठा स्फोट झाला.

ही आग लिक्विड गळतीमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग लागली तेव्हा रात्रीपाळीचे कामगार कामावर होते. आग लागल्यानंतर तिथं मोठा गोंधळ उडाला. बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असतानाच कामगार जखमी झाले. त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला. याटाकीत पाचशे लिटर लिक्विड असल्याचे कंपनीचे कमल वाधवानी यांनी सांगितले.

यावेळी बाळापूर उपविभागीय अधिकारी डॉ रामेश्वर पुरी, पटवारी प्रशांत बुले, जुनेशहर ठाणेदार सेवानंद वानखडे, डाबकरोड पोलिस ठाण्याचे ठाणेदार शिरिष खंडारे व त्यांचा पोलिस ताफा घटनास्थळी दाखल झाला.

अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी

आगीची माहिती मिळताच अकोला अग्निशमन दलाचे तीन बंब व दोन टँकर घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

घटनास्थळी काही काळ तणावाची स्थिती

या घटनेतील मृतक आसिफ खान हा पारस येथील रहिवासी असून या घटनेबाबत माहिती मिळताच मृताचे नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. व या कंपनीचा व्यवस्थापक किंवा कंत्राटदाराला इथे बोलवा अन्यथा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, अशी भूमिका घेत काही काळ तणावाची स्थीती निर्माण केली होती.

loading image
go to top