esakal | महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला मारहाण, राष्ट्रवादीच्या नेत्यांसह चौघांवर गुन्हे

बोलून बातमी शोधा

महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला मारहाण, राष्ट्रवादीच्या नेत्यांसह चौघांवर गुन्हे
महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला मारहाण, राष्ट्रवादीच्या नेत्यांसह चौघांवर गुन्हे
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिवरखेड (जि. अकोला) ः हिवरखेड पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या अडगाव येथील महावितरणचे कनिष्ठ अभियंता विशाल विनायकराव गावकरी रा. तेल्हारा यांना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या एका नेत्यासह चौघांविरुद्ध हिवरखेड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रमीज अली रफिक अली मिरसाहेब रा. सिरसोली यांनी नवीन वीजजोडणीसाठी अर्ज आणला होता. दरम्यान, कनिष्ठ अभियंता गावकरी यांनी जुनी थकबाकी भरल्यानंतरच अर्ज सादर करा, असे सांगितले असता आरोपींनी संगनमत करून फिर्यादीस शिवीगाळ केल व त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

फिर्यादीच्या तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी आरोपी रमिज अली रफिक अली मिरसाहेब रा. सिरसोली, ऋषिकेश तराळे, गौरव ढोले, रामप्रभू तराळे सर्व रा. एदलापूर या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संपादन - विवेक मेतकर