esakal | शाळेत कर्मचाऱ्यांची ५० टक्केच असावी उपस्थिती
sakal

बोलून बातमी शोधा

शाळेत कर्मचाऱ्यांची ५० टक्केच असावी उपस्थिती

शाळेत कर्मचाऱ्यांची ५० टक्केच असावी उपस्थिती

sakal_logo
By
विवेक मेतकर

रिसोड (जि.वाशीम): आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाकडून वारंवार सूचना देऊनही योग्य खबरदारी न घेतल्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या तालुक्यासह जिल्ह्यात झपाट्याने वाढली आहे. या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी शाळा बंदच आहेत.

परंतु, शिक्षकांना शाळेत जाऊन ऑनलाईन अध्यापन करणे सुरूच होते. शाळेत एकाच वेळेस सर्व कर्मचारी उपस्थित राहत असल्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका अधिक वाढत चालला होता. विविध शैक्षणिक संघटनांनी याबाबत शासनाकडे मागणी करून शिक्षकांच्या जिवित्वाशी होत असलेला खेळ थांबविण्याची विनंती केली. शासनाने गांभीर्याने घेत शाळेत शिक्षक व कर्मचारी यांच्याकरिता पन्नास टक्के उपस्थितीचा अध्यादेश पारित केला आहे.

कोरोना साखळी तोडण्यासाठी शासकीय स्तरावरून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत आहेत. संबंधित उपसंचालकाने याआधीच पत्र काढून सर्व शाळांना तसे नियोजन करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, आपल्या शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र आले नाही या अशयाखाली अनेक मुख्याध्यापकांनी आपली मनमानी भूमिका घेत सर्व शिक्षकांना उपस्थित राहण्यासाठी मजबूर केले. सर्वच कर्मचारी उपस्थित राहण्यासाठी आग्रही असणाऱ्या शाळेत लोकप्रतिनिधींच्या शाळेचाही समावेश आहे.

कोरोना संसर्ग झालेले अनेक शिक्षक सध्या तालुक्यात आहेत. काही शिक्षक सध्याही उपचार घेत आहेत, तर तालुक्यातील एका मुख्याध्यापकाचा मृत्यू काही दिवसांपूर्वीच कोरोनामुळे झाला होता. या सर्व बाबींचा विचार करता माध्यमिक शिक्षणाधिकारी रमेश तांगडे यांनी शाळेत पन्नास टक्के म्हणजे निम्मेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित असावेत, असे ता.१२ एप्रिलला पत्र काढून कळविले आहे. अंमलबजावणीचा तसा अहवाल कार्यालयास कार्यालयास सादर करावयास सांगितले आहे. यामुळे मनमानी करणाऱ्या मुख्याध्यापकाना आवर घालून शिक्षकांचे कोरोना संसर्गापासून संरक्षण करता येईल व कोरोना साखळी तोडण्यासाठी मदत होईल.

संपादन - विवेक मेतकर