कोरोना लसीकरणासाठी पथनाट्याद्वारे जनजागृती | Akola | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना लसीकरणासाठी पथनाट्याद्वारे जनजागृती

अकोला : कोरोना लसीकरणासाठी पथनाट्याद्वारे जनजागृती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्ह्यात कोविड लसीकरण १०० टक्के करण्याच्या दृष्टीने दहा दिवसांच्या कालावधित लसीकरणासाठी ‘घर घर दस्तक’ ही विशेष मोहीम जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केलेल्या आवाहनानुसार टाकळी जलम येथे राबविण्यात येत आहे. शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली ठग, अकोला गट शिक्षणाधिकारी श्याम राऊत आणि केंद्र प्रमुख डॉ. नीलिमा आमले यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक सहदेव मेसरे, शिक्षक नीलेश कवडे, अंगणवाडी सेविका संगीता दामोदर आणि आशा सेविका जयश्री पोहोरकर यांच्या पथकाच्यावतीने टाकळी जलम येथे कोविड लसीकरण बाबत जनजागृती आणि जनतेने लस घेण्याचे आवाहन करण्यासाठी ‘घर घर दस्तक’ ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

हेही वाचा: अकोला : केंद्रातील सरकार विश्वासघातकी

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी गावपातळीवर जि. प. प्राथमिक शाळा टाकळी जलम च्या विद्यार्थ्यांनी गावात ठिकठिकाणी पथनाट्य सादर केले. जागर पथनाट्यामध्ये युगांती मुंडे, बबली रताळे, राशी घाटोळे, अंकिता तायडे, सम्राट खंडारे, ऋषिकेश बोर्डे, अभिजित बोर्डे आणि वैभव सैरीशे यांनी सहभाग घेतला. पथनाट्याचे लेखन-दिग्दर्शन निलेश कवडे यांनी केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या पथनाट्यातून कोरोना लसीकरण जनजागृती मुळे गावात कोरोना लसीकरणाच्या टक्क्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

loading image
go to top