हुंडीवाले हत्याकांडात आरोपी गावंडे पितापुत्राचा जामीन अर्ज फेटाळला

भगवान वानखेडे
Wednesday, 29 July 2020

अखिल भारतीय गवळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा बांधकाम व्यावसायिक किसनराव हुंडीवाले यांच्या हत्याकांड प्रकरणातील आरोपी सेवानिवृत्त पोलिस अधिकारी श्रीराम कसदन गावंडे आणि त्याचा मुलगा रणजित श्रीराम गावंडे या दोन आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. यामधील श्रीराम गावंडे याचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळला असून, रणजित गावंडे याचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला.

अकोला  ः अखिल भारतीय गवळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा बांधकाम व्यावसायिक किसनराव हुंडीवाले यांच्या हत्याकांड प्रकरणातील आरोपी सेवानिवृत्त पोलिस अधिकारी श्रीराम कसदन गावंडे आणि त्याचा मुलगा रणजित श्रीराम गावंडे या दोन आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. यामधील श्रीराम गावंडे याचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळला असून, रणजित गावंडे याचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला.

6 मे 2019 रोजी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान किसनराव हुंडीवाले न्यास नोंदणी कार्यालयात त्यांचा मुलगा प्रवीण यांच्यासोबत उपस्थित असताना भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम ऊर्फ छोटू श्रीराम गावंडे, रणजित श्रीराम गावंडे, मुन्ना ऊर्फ प्रवीण श्रीराम गावंडे, धीरज प्रल्हाद गावंडे, सूरज प्रल्हाद गावंडे, श्रीराम कसदन गावंडे, सतीश सुखदेव तायडे, विशाल सुखदेव तायडे, मयूर गणेशलाल अहिरे, दिनेश ठाकूर, प्रतीक दत्तात्रय तोंडे, मंगेश श्रीकृष्ण गावंडे व मोहम्मद साबीर यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात येऊन किसनराव हुंडीवाले यांची हत्या केली होती.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

या प्रकरणातील आरोपी श्रीराम गावंडे याचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळला असून रणजित गावंडे याचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सर्व आरोपींना अटक केली असून यामधील तीन ते चार आरोपींना मुंबई उच्च न्यायाचे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे तर या हत्याकांडातील आरोपी श्रीराम कसदन गावंडे आणि त्यांचा मुलगा रणजीत गावंडे या दोघांचाही जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ तसेच जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The bail application of the accused Gawande son and father in the Akola Hundiwale case was rejected