
अकोला - जिल्ह्यात बकरी ईद व आषाढी एकादशी रविवारी उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने सुरक्षेच्या व वाहतुकीच्या दृष्टीने रविवारी वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार आहे. यासंबंधीचे आदेश वाहतूक पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी शनिवारी बजावले.
बकरी ईदनिमित्त ताजनापेठ लाल बंगला येथून गांधी चौक-कोतवाली चौक-जयहिंद चौक-गंगाधर चौक - किल्ला चौक मार्गे हरीहरपेठ ईदगाह पर्यंत निशान काढण्यात येते व नंतर हरीरहपेठ ईदगाह येथे मुस्लीम बांधवांचे नमाज पठन झाल्यावर याच मार्गाने परत निशान लालबंगला ताजनापेठ येथे परत आणण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सुरक्षेच्या दृष्टीकोणातून तसेच रहदारी नियंत्रणाचे दृष्टीकोणातून पोलिस अधीक्षक यांच्या आदेशाने ताजनापेठ ते वाशिम बायपास या मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक १० जुलै चे सकाळी ७ वाजतापासून ११.३० वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या संख्येने नागरिक जुने शहर येथील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येतात. तरी कोतवाली चौकाकडून काळा मारोती रोड मार्गे डाबकी रोडकडे जाणाऱ्या मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक १० जुलैचे सायंकाळी वाजतापासून ते १० जुलैचे रात्री १२ वाजेपर्यंत खालील नमुद पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. सदर कालावधीत सर्व वाहनधारक, चालक यांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करून गैरसोय टाळावी व पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
असा आहे बदल
गांधी चौक ते वाशीम बायपासकडे जाणारी वाहतूक गांधी चौक, तहसिल कार्यालय, सरकारी बगीचा, लक्झरी स्टॅंड चौक, वाशीम बायपास या मार्गाने वळविण्यात येईल.
वाशीम बायपास, जयहिंद चौक ते बस स्थानककडे येणारी वाहतूक वाशीम बायपास-लक्झरी स्टॅंड, सरकारी बगीचा, अशोक वाटीका, बस स्थानक या मार्गाने वळविण्यात येईल.
बाळापूर नाका, जयहिंद चौक ते बस स्थानक कडे येणारी वाहतूक बाळापूर नाका, वाशीम बायपास, लक्झरी स्टॅंड, सरकारी बगीचा, अशोक वाटीका, बस स्थानक या मार्गाने वळविण्यात येईल.
डाबकी रोड, जयहिंद चौक, बस स्थानक कडे येणारी वाहतूक डाबकी रोड, अगरवेस, अकोट स्टॅंड, अग्रसेन चौक ते रेल्वे स्टेशन किंवा बस स्थानक या मार्गाने वळविण्यात येईल. तसेच या मार्गाची वाहतूक विरुद्ध मार्गाने वळविण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.