आमदारांनी भरला तहसीलदरांना दम...

शिवसेना आमदाराविरोधात नायब तहसीलदारांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
mla nitin dershmukh
mla nitin dershmukhsakal
Updated on

बाळापूर : ‘सत्ता’ काय असते? या शब्दाचा अगदी योग्य अर्थ बाळापूर विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे आमदार व त्यांच्या शिलेदारांकडून अनुभवता येत असल्याची चर्चा बाळापूर महसूल विभागात चांगलीच रंगली आहे. बाळापूर तालुक्यात अवैध वाळू उपसा व वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाने पाऊले उचलली आहेत. मात्र, महसूल विभागाच्या कारवाईत शिवसेना जिल्हाप्रमुख तथा बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख हे अडथळे निर्माण करत असून, मानसिक त्रास देत असल्याचे खुले पत्र बाळापूर प्रभारी तहसीलदार योगेश कौटकार यांनी नुकतेच जिल्हाधिकारी यांना दिले आहे. या पत्रामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, याप्रकरणात जिल्हाधिकारी काय निर्णय देतात? याकडे महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

mla nitin dershmukh
औरंगाबाद जिल्हा दूध संघात यंदा १०० टक्के मतदान, कोण मारणार बाजी?

तहसीलदार डि.एल. मुकुंदे हे मानसिक तणावामुळे वैद्यकीय रजेवर असून, या पदाचा अतिरिक्त प्रभार ३ डिसेंबर २०२१ पासून योगेश कौटकर यांच्याकडे आहे. दरम्यान हा प्रभार नायब तहसीलदार सुरडकर यांच्याकडे होता परंतु, त्यांनी सुद्धा एकाच महिन्यात पदभार काढून घेतल्याने हा पदभार कौटकर यांच्याकडे असल्याचे पत्रात म्हटले आहे. अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी कारवाई करीत असताना १५ जानेवारी रोजी गोपाल वडतकर या इसमाच्या वाळू वाहनावर कारवाई केल्यावर आ. देशमुख यांनी फोन करून ही कारवाई चुकीची असून, वाहन जप्त केल्यामुळे होणारे दर दिवशी पाच हजार नुकसान तुमच्या पगारातून वसूल करावे काय? अशी विचारणा केली. तुम्ही पैसे वसुली करता, हे मला माहीत असून, मी तुमच्या कामावर नाराज आहे अशी, टिप्पणी केली. १४ जानेवारीला आ. देशमुख यांनी वाळू वाहतुकीची पावती असताना अशी, फालतू सारखी कामे करीत जाऊ नका, असे पत्रात म्हटले आहे.

आमदार साहेब...हे वागणं बरं नव्हं..!

डोळे कोणाला दाखवतोस..., तू त्याला तुझी बॉडी दाखवातोस काय? डोळे दाखवू नकोस.! हे शब्द आहेत आमदार महोदयांचे. १४ जानेवारीला दोन वाहनांवर झालेल्या कारवाईचे कागद घेऊन नायब तहसीलदार व त्यांचे सहकारी आमदारांच्या पक्ष कार्यालयात सायंकाळी पाच वाजता गेले असता, आमदारांनी या अधिकाऱ्यांना दमदाटी केली. यावेळी तेथे कारवाई केलेल्या वाहनाचे मालक असलम देशमुख, राहुल कराळे, लविश घोगरे, विपुल घोगरे अजून, एक दोन कार्यकर्ते उपस्थित होते. असा उल्लेख कौटकर यांनी पत्रात केला आहे. लोकांच्या हक्काची आणि न्यायाची मागणी करणारे लोकप्रतिनिधीच बेजबाबदारपणे वागत असल्याबद्दल नायब तहसीलदार कौटकर यांनी नाराजी व्यक्त केली.

तेथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्याने ‘तुझे अजून दुध प्यायचे ओठ सुकले नाहीत.. तू आम्हाला शहाणपणा शिकावातोयस काय? किती सर्विस झाली तुझी’? या शब्दात दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एक कार्यकर्ता अंगावर धावून आल्या सारखा करून महागात पडेल, गुन्हे दाखल करतो... असे, सांगून दमदाटी करायला लागला. हा सर्व प्रकार आमदारांच्या पक्ष कार्यालयात त्यांच्या समक्ष घडत आहे याचा विश्वासच बसत नसल्यामुळे बधीर झालो असल्याचेही कौटकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

mla nitin dershmukh
खारेगाव मध्ये चाकूचा धाक दाखवून मोबाईल लंपास करणाऱ्या तरुणाला अटक

आमदार म्हणतात ‘महाखनीज ॲप बोगस’

महसूल विभागाने वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाला ताब्यात घेत कारवाई केल्याचे आमदार नितीन देशमुख यांनी खुप मनाला लावून घेतले आहे. पथकाने महाखानीज प्रणाली मार्फत तपासणी केली असता, सदर वाहन अवैध असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे आमदारांना अधिकाऱ्यांनी सांगीतले. मात्र, उलट आमदारांनी महाखनीज प्रणाली बोगस असून, ते जिल्हाधिकाऱ्यांनी पर्सनल बनवून घेतले आहे व ते शासनाचे ॲप नसल्याचे आमदारांनी म्हटले आहे.

mla nitin dershmukh
वॉचमनला चाकूचा धाक दाखवून धाडसी चोरी; पावणेसहा लाखांचा मुद्देमाल लंपास

जे अधिकारी अठराशे निराधार लोकांच्या खात्यात पैसे जमा करत नाहीत, सानुग्रह मदतीचे अनुदान सहा-सहा महिने खात्यात जमा करत नाहीत, पुरात वाहून गेलेल्यांच्या वारसांना सहा महिने मदत दिली जात नाही व रॉयल्टीवर आठ तासांची वेळ शिल्लक असूनही अशा वाहनांना पकडून त्यांना पैशाची मागणी करतात अशा, अधिकाऱ्यांची आम्ही आरती ओवाळायची का? अशा कामचुकार अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही.

-नितीन देशमुख,

आमदार, बाळापूर मतदारसंघ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com