

Akola News
esakal
बाळापूर: धुळे-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (ता.५) पहाटेच्या सुमारास तीन ट्रकचा भीषण अपघात झाला. क्षमतेपेक्षा जास्त माल भरून सुसाट धावणाऱ्या एका ट्रकने महामार्गावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेनंतर पाठीमागून येणारा तिसरा ट्रकही या वाहनांवर आदळल्याने तिन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात दोन चालक गंभीर जखमी झाले आहेत.