बार्शीटाकळी: तालुक्यातील महान-जांभरुण रोडवरील धरण परिसरातील जंगलात कडू निबांच्या झाडाला एकाच दोराने लटकलेल्या अवस्थेत दोन व्यक्तींचे मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ].ही घटना आत्महत्या की घातपात, याबाबत विविध तर्कवितर्क सुरू असतानाच आत्महत्येपूर्वी मृतांनी कुटुंबीयांना फोन करून माहिती दिल्याची बाब समोर आली आहे. मृतांमध्ये किशोर सोनटक्के (वय ४०, कानडी बाजार, ता. मूर्तीजापूर), तर किशोर मारोती बोडखे (वय ५५, रा. वरूड बु., ता. मंगरूळपिर) यांचा समावेश आहे. दोघेही जवळचे मित्र असल्याची चर्चा परिसरात सुरू असून या घटनेने दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे..Akola News: आरटीई प्रवेश रखडले; ४९७ जागा अद्याप रिक्त; जिल्ह्यात आतापर्यंत केवळ एक हजार ५२१ विद्यार्थ्यांचेच प्रवेश.या बाबत मिळालेल्या माहितीनुसार किशोर सोनटक्के हे रविवारी, १० मे रोजी अमरावतीला जातो, असे सांगून दुचाकीने महान येथे आले होते. त्यानंतर त्यांचे मित्र किशोर बोडखे हे देखील त्याच दिवशी महान येथे पोहोचले. किशोर सोनटक्के यांनी रविवारी रात्री आपल्या घरी फोन करून त्यांची दुचाकी महान येथील महावीर हॉटेलसमोर उभी असून चावी तिथेच ठेवली असल्याची माहिती दिली..तसेच ‘आम्ही दोघे आत्महत्या करत आहोत,’ असेही त्यांनी फोनवर सांगितल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारानंतर घाबरलेल्या कुटुंबीयांनी तातडीने पिंजर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. मात्र त्यानंतर दोघांचाही संपर्क तुटल्याने कुटुंबीय चिंतेत होते. दरम्यान, महान - जांभरुण रोडवरील धरण परिसरातील जंगल भागातून तीव्र दुर्गंधी येत असल्याने काही नागरिकांनी परिसरात जाऊन पाहणी केली असता कडू निबांच्या झाडाला एकाच दोराच्या सहाय्याने दोघांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आले..ही घटना दोन ते तीन दिवसांपूर्वी घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच बार्शीटाकळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण धुमाळ, पिंजरचे ठाणेदार गंगाधर दराडे, पीएसआय नवघरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पिंजर येथील संत गाडगे बाबा बचाव पथकाच्या मदतीने दोन्ही मृतदेह झाडावरून खाली उतरवण्यात आले..Premium|India unique museums guide : फोटोग्राफीचा १८० वर्षांचा वारसा एकाच छताखाली; पुण्याच्या हाजी फरीदभाई शेख यांच्या कॅमेरा संग्रहालयाची रंजक सफर.त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. दरम्यान, मृतांनी फोनवर आत्महत्येची माहिती दिली असली तरी एकाच दोराला दोघांचे मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून तपासानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.