

The Beaver Supermoon will appear in the night sky on November 24 near the Pleiades star cluster.
esakal
अकोला : बालपणापासून प्रत्येकाच्या सोबतीला असलेला चंद्र २४ नोव्हेंबरला एका वेगळ्याच रूपात आकाशात अवतरणार आहे. कार्तिकी पौर्णिमेच्या पर्वावर यंदा ‘बिव्हर सुपरमून’ ही खगोलीय घटना घडणार असून, यावेळी चंद्र नेहमीच्या पौर्णिमेपेक्षा अधिक मोठा आणि तेजस्वी दिसणार आहे. पृथ्वीच्या तुलनेने जवळ येणारा हा पूर्ण चंद्र आणि त्याच्या सान्निध्यात दिसणारा कृत्तिका तारकासमूह आकाशनिरीक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.