esakal | ‘जीएमसी’त ऑक्सिजनच्या खाटांसाठी खाटाटोप!
sakal

बोलून बातमी शोधा

‘जीएमसी’त ऑक्सिजनच्या खाटांसाठी खाटाटोप!

‘जीएमसी’त ऑक्सिजनच्या खाटांसाठी खाटाटोप!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोनाच्या रुग्णांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात खाटा (बेड) उपलब्ध नसल्याची बाब सोमवारी (ता. २६) समोर आली. तर आरकेटीमध्ये केवळ चार, जिल्हा स्त्री रुग्णालयात केवळ १३ खाटाच रुग्णांसाठी शिल्लक असल्याने ऑक्सिजन खाटांसाठी रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची परवड होत असल्याचे दिसून येत आहे. याव्यतिरिक्त खासगी रुग्णालयांमध्ये मोजक्याच खाटा उपलब्ध असल्याने त्यासाठी सुद्धा रुग्णांना वेटिंगवर रहावे लागत आहे.

नोव्हेल कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या कोविड-१९ रोगाने जिल्ह्यात मार्च, एप्रिल २०२० पासून धुमाकूळ घातला आहे. सुरुवातीच्या काळात महानगरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा नंतर गाव, खेड्यात सुद्धा प्रादुर्भाव वाढला. सप्टेंबर २०२० मध्ये तर कोरोनाग्रस्तांच्या संख्येने उच्चांकी गाठली होती. या महिन्यात नव्याने आढळणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या दोन हजारावर पोहचली होती. दरम्यान आता जिल्ह्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्णांना ऑक्सिजनच्या खाटा मिळणे सुद्धा दुरापास्त झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

अशी आहे स्थिती

- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयत सोमवारी (ता. २६) ऑक्सिजनची एकही खाट उपलब्ध झाली नाही. मूर्तिजापूर येथील शासकीय रुग्णालयात २, आरकेटी अकोलामध्ये ४, जिल्हा स्त्री रुग्णालयात १३ ऑक्सिजनच्या खाटा रिक्त आहेत.

- खासगीतील अवघते हॉस्पीटलमध्ये १, सूर्यचंद्र हॉस्पीटलमध्ये १, देवसार होस्टेलमध्ये ८, बाबन रुग्णालय मूर्तिजापूरमध्ये ४ आयसीयूच्या व २६ ऑक्सिजनच्या, ठाकरे हॉस्पिटलमध्ये ४, उषाई मल्टी. हॉस्पिटलमध्ये १४, ओझोनमध्ये १, नवजीवन हॉस्पिटलमध्ये ४, देशमुख हॉस्पिटलमध्ये एक ऑक्सीजनच्या खाटा रिक्त आहे.

दोन वर्षांपासून बेपत्ता मुलीचा पोलिसांनी घेताल शोध

अकोला, ता. २६ ः सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेएशनच्या हद्दीतून सन २०१९ मध्ये बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध पोलिसांनी लावला आहे. तिला तिच्या प्रियकरासोबत हरियाणातील गुरुग्राम येथील ताब्यात घेवून सिव्हिल लाइन्स पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

अनैतिक मानवी वाहतूक कक्षने केलेल्या तपासात पीडित मुलगी ही गुरुग्राम येथे राहत असल्याची माहिती मिळाली होती. तिचा शोध घेवून तिला विश्वासात घेवून तिला अकोला येथे आणण्यात आले व पुढील कार्यवाहीसाठी सिव्हिल लाईन्स पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image