Bharat Jodo Yatra Akola : ‘भारत जोडो’ यात्रेचा जिल्ह्यातील मुक्काम हलला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi

Bharat Jodo Yatra Akola : ‘भारत जोडो’ यात्रेचा जिल्ह्यातील मुक्काम हलला

मालेगाव : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेचे मालेगाव शहरांमध्ये सकाळी शेलू फाटा येथे आगमन झाले.त्यावेळी कार्यकर्त्यांनी,व सर्वसामान्य लोकांनी जल्लोषात स्वागत केले. ही यात्रा मेडशी मार्गे अकोला जिल्ह्यात दाखल झाली. दोन दिवस जिल्ह्यात या यात्रेला मिळालेला उत्साह ऐतिहासिक ठरला.यात्रेचे स्वागत करण्यासाठी आणि मात्रेत सामिल होण्यासाठी सकाळी पाच पासून खेड्यापाड्यातील लोकांनी गर्दी केली होती.

शेलु फाटा ते मुंदडा विद्यालयापर्यंत लोकांनी हाती झेंडे घेऊन रांगेत उभे राहिले स्वागत केले .शहर काँग्रेसमय झाले होते. राहुल गांधी यांना पाहण्यासाठी व त्यांचे भाषण ऐकण्यासाठी रिसोड, डोगगाव, मेहकर सह तालुक्यातील, खेड्यापाड्यातील महिला, पुरुष, लहान बालक, काँग्रेसचे जुन्या कार्यकर्त्यांसह इतर पक्षातील लोकही मोठ्या संख्येने दिसत होते. शेलु फाटा ते पावर स्टेशन पर्यंत लोकांची गर्दी होती. बँड बाजाच्या पथकाने व राहुल गांधी यांच्या गरजेने सर्व परिसर दणाणून गेला होता. यानंतर येथील मुंदडा विद्यालयात दुपारची विश्रांती घेवून ही यात्रा मेडशीकडे मार्गस्थ झाली. या मार्गावर रिधोरा राजूरा, डही, वारंगी येथील नागरीकांनी रस्त्याच्या कडेला एकच गर्दी केली होती. साय॔काळी मेडशी येथील सभेला संबोधीत करून राहूल गांधीची ही भारत जोडो यात्रा अकोला जिल्ह्यात दाखल झाली.

उत्साह अन रूखरूखही

गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यातील काॅग्रेसजनांमधे भारत जोडो यात्रेने प्रचंड उर्जा भरली होती. राहूल गांधी यांच्या दोन दिवसाच्या वास्तव्याने तर काॅग्रेस कार्यकर्ते जोशात होते. आता ही यात्रा जिल्ह्यातून गेल्यानंतर अनेक कार्यकर्ते मेडशी येथून परत फिरले त्यांच्या मनात रूखरूख कायम राहीली.

गोडंबी उत्पादक महिलांशी संवाद

खासदार राहुल गांधी यांनी आज (ता१६) रोजी भारत जोडो यात्रा दरम्यान गोडंबी उत्पादक महिलांशी संवाद साधला अमानी गावाजवळ त्यांनी थांबुन महिलांशी संवाद साधला यावेळी त्यांनी अमानी येथील संगीता संतोष भुरकाडे,चंदा करवते,गीता पिंटु लोखंडे, खडसे बाई तायडे बाई,गायकवाड बाई, झळके,अँड गितांजली रमेश गवळी,सरपंच रंजना अनिल जाधव यांच्या शी संवाद साधला

आज राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी मालेगाव येथिल ना ना मुंदडा विद्यालयात आलो होतो त्यावेळी सुरक्षा यंत्रणेने अडविल्यानंतर मी आमदार अमित झनक यांना मोबाईल केला असता त्यांनी तो उचलला नाही त्यांनतर माझी भेट प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याशी झाली त्यांनी मला दोन प्रवेशद्वारामधून मधून आत सोडले पुढच्या प्रवेशद्वारावर मला अडविल्यानंतर मी आमदार झनक यांना भ्रमणध्वनी केल्यानंतर त्यांनी सांगितले की राहुलजी तुम्हाला बाहेरच भेटतील परंतु माझी राहुल गांधी यांच्याशी भेट झाली नाही.

-विनायकराव देशमुख , अखिल भारतीय नेहरू ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष