Akola : ‘भारत जोडो’साठी पोलिस बंदोबस्त जोरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police

Akola : ‘भारत जोडो’साठी पोलिस बंदोबस्त जोरात

अकोला : काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने अकोला जिल्ह्याच्या सीमेपासून ते थेट बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेपर्यंत पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यासाठी अकोल्यासह अमरावती परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची कुमक अकोला जिल्ह्यात ढेरे दाखल झाली असून, राज्य राखीव दलाचे जवानही नियुक्त करण्यात आले आहेच. सुमारे १ हजार ७०० पोलिस कर्मचारी व अधिकारी या बंदोबस्तात असून, त्यामध्ये वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा बुधवारी (ता. १६) रात्री जिल्ह्यात दाखल झाली. पातूर येथील साईबाबा जिनिंग फॅक्टरीत भारत जोडो यात्रेतील खासदार राहुल गांधी यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांचा मुक्काम आहे. यात्रा गुरुवारी (ता. १७) वाडेगावमार्गे बाळापूरकडे रवाना होणार आहे. त्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त राष्ट्रीय महामार्ग १६१ वर तैनात करण्यात आला आहे. मंगळवार सकाळपासूनच पोलिस कर्मचारी व अधिकारी या महामार्गावर गस्त घालत आहेत. बुधवारी दुपारी तीन वाजतापासून राष्ट्रीय महामार्गावरील संपूर्ण वाहतूक थांबविण्यात आली.

असा आहे पोलिस बंदोबस्त

विशेष पोलिस महानिरीक्षक

पोलिस अधीक्षक

अप्पर पोलिस अधीक्षक ः ०४

डीवायएसपी ः ०४

पोलिस निरीक्षक ः २५

सहाय्यक पोलिस निरीक्षक ः २८

पोलिस कर्मचारी ः १०००

महिला पोलिस कर्मचारी ः ३००

राज्य राखीव दलासह इतर जवान ः ५००