बुलडाणा जिल्ह्याच्या भूमिपुत्राचा राष्ट्रपतींनी केला सन्मान | Buldana | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रपती रामनाथ कोविद यांच्याहस्ते सन्मान स्वीकारताना ज्ञानेश्‍वर साबळे.

बुलडाणा जिल्ह्याच्या भूमिपुत्राचा राष्ट्रपतींनी केला सन्मान

sakal_logo
By
आशिष ठाकरे

बुलडाणा : चिखली तालुक्याचे नाव सदैव देश सेवेतील सैनिकांची भूमी म्हणून ओळखले जाते. तालुक्यातील बहुतांश गावातील भूमिपुत्र देशसेवेसाठी असून, अनेकांनी देश संरक्षणासाठी वेळप्रसंगी प्राणाची आहुती दिली आहे. त्यामुळे नेहमी तालुक्याचे नाव देशपातळीवर झळकत आले आहे. अशाच एका विक्रमाची सरकारकडून दखल घेत तालुक्यातील उंद्री येथील ज्ञानेश्वर श्रीराम साबळे यांचा 22 नोव्हेंबरला राष्ट्रपती रामनाथ कोविद यांच्याहस्ते शौर्यपदक देऊन सन्मान करण्यात आला.

चिखली तालुक्यातील उंद्री गावातील ज्ञानेश्‍वर श्रीराम साबळे यांचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर शिवाजी विद्यालय, अमर विद्यालयात माध्यमिक शिक्षण घेऊन पदवीचे मुक्तविद्यापीठातून पूर्ण केली. सामान्य शेतकरी कुटुंबात श्री. साबळे यांचा जन्म झाला होता. यानंतर 2005 मध्ये सैन्य भरतीमध्ये मेहनत केल्याने 2006 मध्ये त्यांना नियुक्ती मिळाली. त्यांनी छत्तीसगड राज्यातील सुकमा, आसाम राज्यात सेवा दिल्यानंतर जम्मू व काश्मीर भागातील बारामुल्ला परिसरात 2016 मध्ये नियुक्ती झाली.

हेही वाचा: पाणी असूनही पिण्याच्या पाण्याची समस्या; पाटण तालुक्‍यात ठोस उपाययोजनांचा अभाव!

दरम्यान,53 बटालियनमध्ये वान असलेले ज्ञानेश्‍वर श्रीराम साबळे यांनी विरता आणि धैर्य दाखवीत जम्मू व काश्मीर राज्यातील बारामुल्ला ठाण्याअंतर्गत कलहर येथे 19 ऑक्टोबर 2018 ला श्रीनगर ते बारामुला नाक्यावर कर्तव्य बजावीत होते. यावेळी पोलिस कर्मचार्‍यांनी प्रत्येक वाहनाची तपासणी सुरू केली असता अचानक गोळीबार सुरू झाला. यावेळी श्री. साबळे यांनी समयसूचकता दाखवीत एका दहशतवाद्याला जागीच तर दुसरा पळू जात असताना पाठलाग करत कंठस्नान घातले.

दोन्ही दहशतवाद्यांचा जैश- ए- मोहम्मद या आतंकवादी संघटनेसोबत संबंध असल्याचे नंतर सिद्ध होऊन ते अतिशय धोकादायक होते. त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी केंद्र शासनाने दखल घेतली होती. परंतु, कोरोना संसर्ग पाहता सदर सन्मान पुढे ढकलण्यात आला होता. यंदा तो योग येऊन ज्ञानेश्वर श्रीराम साबळे यांना 22 नोव्हेंबरला संध्याकाळी राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्यपदक देऊन गौरविण्यात आले. त्यांचा हा सन्मान दिल्ली येथे राष्ट्रपती रामनाथ कोविद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्यात शौर्यचक्र प्रदान करण्यात आले.

हेही वाचा: जळगाव : एरंडोल पालिकेस ‘थ्री स्टार’ मानांकन

जिल्ह्यातील दुसरे सन्मानित जवान

राष्ट्रपतींकडून सन्मान झालेले ज्ञानेश्‍वर श्रीराम साबळे हे शौर्यपदक मिळालेले जिल्ह्यातील पुरस्कारप्राप्त जवान आहे.यापूर्वी 2002 मध्ये चिखली तालुक्यातील किन्होळा येथील रमेश बाहेकर यांना तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्याहस्ते शौर्यपदक देऊन सन्मान करण्यात आला होता.

उंद्री होणार सन्मान

राष्ट्रपतींकडून शौर्य पदक देऊन सन्मान झाल्यानंतर ज्ञानेश्‍वर साबळे हे 24 नोव्हेंबरला उंद्री येथे सुट्टीवर येत आहे. त्यांच्या आगमनानंतर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

"देशसेवा करताना कुठल्याही फळाची अपेक्षा न करताना प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणे हेच महत्त्वाचे कार्य आहे. प्रत्येक सैनिकांचे स्वप्न असते की आपला सन्मान व्हावा आणि तेच स्वप्न माझे साकार झाले आहे. युवकांनी सैन्यात भरती होण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. सीमेवरील सुरक्षा सैन्य बघते, देशांतर्गत सुरक्षा पोलिस बघतात आणि आरोग्य यंत्रणा ही अंतर्गत रक्षण करते त्यामुळे यांचा सदैव सन्मान करत ते कुठेही बाधित होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. हा सन्मान माझ्यासोबतच सर्व कर्तव्य बजावणार्‍या सैनिकांचा सुद्धा आहे."

- ज्ञानेश्‍वर श्रीराम साबळे, शौर्य पुरस्कार प्राप्त सैनिक, बारामुल्ला.

loading image
go to top