

Cycle on Water, Not Roads: Engineer Arvind Dethe’s Unique Innovation
sakal
अंत्री मलकापूर: वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम आणि आपल्या भन्नाट आयडियासाठी प्रसिद्ध असलेल्या इंजिनिअर अरविंद देठे यांनी आता चक्क पाण्यावर चालणारी सायकल बनविली असून सोमवारी या सायकलचे लोकार्पण करण्यात आले. अंत्री मलकापूर येथील पर्यटन केंद्रात गेल्यानंतर पर्यटकांना आता पाण्यावर चालणारी ही सायकल चालवून एक वेगळाच आनंद लुटता येणार आहे.