बायोडिझेलचा गोरखधंदा; नेत्यांची नावे चर्चेत

पोलिसांवर दबाव; तपासाची गती मंदावली; वरिष्ठ पातळीवरून राजकीय हस्तक्षेप
biodisel 1.jpg
biodisel 1.jpgsakal

अकोला : पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने रिधोरा येथील कलकत्ता धाब्याचे जवळ सुरू असलेल्या अनाधिकृत बायो डिझेल पम्पावरून डिझेल जप्त केले होते. या अवैध धंद्यात अनेक मोठे नेते गुंतले असल्याची शक्यता वर्तविली जात असून, त्यांना वाचवण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून पोलिसांवर प्रचंड दबाव येत आहे. तपासात आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

डिझेलमध्ये भेसळ करून जास्त दराने विक्री केली जात असताना शासनाचा कोणताही परवाना जवळ नव्हता. पोलिस पथक व बाळापूर पुरवठा विभागाचे निरीक्षण अधिकारी अर्चना भगत यांच्या सयुक्त पथकाने छापा मारून ट्रक क्रमाक जीजे ०३ बीडब्ल्यू ७१७४ मध्ये बायो डिझेल भरून विक्री सुरू असताना कारवाई केली. अनाधिकृतपने चार हजार लीटर डिझेल विक्रीसाठी साठवण्यात आले होते. घटनास्थळावरून चार अरोपींना अटक करण्यात आली. त्यात अजमलभाई इब्राहिम रा. राजकोट गुजरात, हिम्मतसिंग बोरसिंग रा देवगढ राजस्थान, सैय्यद यूनुस सय्यद यूसुफ रा. जुनेशहर अकोला या आरोपीचा समावेश आहे.

आरोपीविरुद्ध बाळापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र, या व्यवसायात अकोला शहरातील एका नेत्याचे नाव आल्याने तपासाची गती मंदावली आहे. या नेत्याला वाचवण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून पोलिसांवर दबाव टाकला जात असल्याने या नेत्याला अकोल्यातील पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी थेट फोन करून हा काय प्रकार सुरू आहे, पक्षाची बदनामी होत असल्याची विचारणा केल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासात या नेत्यांवर कारवाई झाल्यास या धंद्यात गुंतलेले आणखी मोठी नावेही समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मुख्य मालकांवर कारवाई?

अकोला शहराजवळ कारवाई करीत बायो डिझेलचा गोरख धंदा उजेडात आणल्यानंतर यात काही आरोपींना अटक करण्यात आली. मात्र, मुख्य मालकावर अद्यापही कारवाई नाही. हा पम्प शेगाव येथील एका राजकीय नेत्याचा असल्याची माहिती असून, त्याने तो अकोल्यातील एका राजकीय नेत्याला भाड्याने चालविण्यासाठी दिला होता. या दोघांचीही पोलिसांनी चौकशी केली असून, त्यांना वाचवण्यासाठी वरिष्ठ राजकीय नेत्यांकडून फिल्डिंग लावली जात असल्याने अद्यापही मुळ मालक व भाडेने पम्प चालवण्यासाठी घेणाऱ्या मालकमावर कारवाई झाली नाही.

तपास अधिकाऱ्यांकडून वरिष्ठ अंधारात

बायो डिझेलच्या कारवाई तपास अधिकाऱ्यांकडून तपास करताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच अंधारात ठेवले जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता वरिष्ठ पोलिस अधिकारी कोणती कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे. या प्रकरणावर पोलिस अधीक्षक जातीने लक्ष ठेवून आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com