banjara community protest
sakal
अकोला - महाराष्ट्रातील बंजारा व लभाण समाज आदिवासी समुदायाच्या संविधानाच्या कलम ३४२ अंतर्गत निश्चित केलेल्या पाच कसोट्याही पूर्ण करत नसल्यामुळे व १९०९ मध्ये प्रकाशित हैदराबाद स्टेट गॅझेटीअरमध्ये बंजारा समाजाला 'धान्य वाहून नेणारे समाज' म्हणून उल्लेख केल्यामुळे त्यांना अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात येऊ नये, अशी प्रमुख मागणी घेऊन बिरसा क्रांती दलतर्फे सोमवारी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.