Akola News : अकोल्यात नागरिक तर सोडाच, आमदारही असुरक्षित? काँग्रेस आमदाराला १० कोटीची डिमांड, पोलिस प्रशासनाची चुप्पी

Akola MLA Threat : अकोल्यात आमदारांना धमक्यांचे सत्र सुरू असून, आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगकडून १० कोटींच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. अकोटच्या आमदारांनंतर आता दुसऱ्या आमदाराला लक्ष्य केल्याने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून घबराट पसरली आहे.
Akola MLA Threat

Akola MLA Threat

sakal

Updated on

अकोला : जिल्ह्यात गुन्हेगारीचे सावट इतके गडद झाले आहे की आता सामान्य नागरिकांबरोबरच लोकप्रतिनिधीही सुरक्षित नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सलग दुसऱ्या आमदाराला खंडणीसाठी धमकी आल्याने अकोल्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अकोला पश्चिम मतदारसंघातील काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगकडून तब्बल १० कोटी रुपयांच्या खंडणीची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापूर्वी अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनाही धमकी मिळाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सुरक्षीततेच्या दृष्टीने एवढ्या महत्वपूर्ण घटना घडूनही अकोला पोलिसांनी याबाबत माहिती देण्याचे टाळले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com