

Political Bargaining Intensifies Ahead of Akola Elections
Sakal
श्रीकांत राऊत
अकोला : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक असताना युती-आघाडीचा फॉर्म्युला ठरत नसल्याचे चित्र आहे. चर्चेच्या केवळ बैठकांवर बैठका सुरू असून जागावाटपावर एकमत होत नसल्याने उमेदवारांचाही जीव भांड्यात पडला आहे. दोन्ही बाजूने चर्चेच्या फेऱ्यांवर फेऱ्या सुरू आहेत, मात्र मित्रांना किती वाटा द्यायच्या यावर महाविकास आघाडीतील काँग्रेस व युतीतील भाजपकडून जोरदार ‘बार्गेनिंग’ केली जात आहे. युती-आघाडीचा फॉर्म्युला कधी जाहीर होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.