अकोला : भाजप-शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये हाणामारी; पूरपीडितांचे धनादेश वाटपावरून वाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena-bjp

अकोला : भाजप-शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये हाणामारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : भाजप आणि शिवसेना नगरसेवकांमध्ये हाणामारीची घटना बुधवारी रात्री उशिरा जुने शहरातील शिवसेना वसाहतीमध्ये घडली. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून जुने शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

जुने शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या प्रभाग १८ मधील शिवसेना वसाहतीमधील पूरपीडितांना २४ जुलै २०२१ रोजी झालेल्या पुरातील नुकसानाची भरपाई म्हणून शासनाकडून देण्यात आलेल्या मदतीचे धनादेश वाटपाच्या श्रेयातून नगरसेविका सपना नवले यांचे पती अश्विन नवले व भाजप नगरसेवक अमोल गोले यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले.

हेही वाचा: रश्मी देसाईचा ट्यूब ब्रामध्ये बोल्ड फोटोशूट

नवले यांच्यासह अविनाश गंगलवार व भाऊ नितीन गंगलवार यांनी भाजप नगरसेवक अमोल गोगे यांनी मारहाण केली. खिशातील दोन हजार रुपये काढून घेतल्याची तक्रारी गोगे यांनी केली. दुसरीकडे शिवसेनेच्या नगरसेविका सपना नवले व अश्विन नवले यांनी केलेल्या तक्रारीवरून नगरसेवक अमोल गोगे व त्यांचे भाऊ नवीन गोगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रेयातून झाला वाद

पूरपीडितांना मदत मिळावी म्हणून दोन महिन्यांपासून शिवसेनेचे अश्विन नवले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलने केली होती. मनपा कार्यालयासह विविध ठिकाणी पाठपुरावा करून त्यांनी नव्याने सर्वेक्षण करून घेत मोर्णा नदी काठावरील शिवसेना वसाहतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आर्थिक मदत मिळवून दिली होती. त्याचे धनादेश वाटप करण्याचे श्रेय लाटण्यावरून नवले आणि भाजपचे नगरसेवक अमोल गोले यांच्या वाद झाला.

हेही वाचा: एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याचा खून

आगामी निवडणुकीवर डोळा

प्रभाग १८ मध्ये शिवसेना व भाजपच्या नगरसेवकांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीवर डोळा ठेवत मतदारांना रिझविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शासनाकडून आलेल्या मदतीचे श्रेय घेत मतदारांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी दोन्ही गटाकडून होत असल्याने प्रयत्नातूनच वादाला तोंड फुटले होते. यापूर्वी काही ठिकाणी भाजप-शिवसेना नगरसेवक श्रेय लाटण्याच्या प्रयत्नातून आमने-सामने ठाकले आहेत.

loading image
go to top