Akola politics:'स्थायी’तील संघर्ष टाळण्यासाठी ‘भाजप’ची खेळी; आकाेला महापालिकेत सत्तेसाठी ‘शहर सुधार आघाडी!

Akola municipal politics BJP Tactical move Explained: अकोला महापालिकेत भाजपची 'शहर सुधार आघाडी' सत्तास्थापनेसाठी सज्ज
Akola Civic Politics: BJP’s Tactical Alliance to Secure Power

Akola Civic Politics: BJP’s Tactical Alliance to Secure Power

Sakal

Updated on

अकोला : महानगरपालिकेतील सत्तास्थापनेचा दीर्घकाळ चाललेला राजकीय संघर्ष आता संपुष्टात आल्याचे दिसून येत आहे. भाजपसह मित्रपक्ष व विरोधी गटातील शदर पवारांच्या राष्ट्रवादीने मिळून ‘शहर सुधार आघाडी’ असा स्वतंत्र गट स्थापन केला. या आघाडीचे गट स्थापनेचे पत्र अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात सादर करण्यात आले असून, मंगळवारी (ता.२७) अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर येत्या ३० जानेवारी रोजी महापौर व उपमहापौर पदासाठी विशेष सभेत निवडणूक होणार आहे. दरम्यान, भाजपने शरद पवार गटाचे तीन सदस्य गळाला लावल्याने आता स्थायीतही सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व असणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com