अंध जोडप्यावर भावाचाच प्राणघातक हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

अंध जोडप्यावर भावाचाच प्राणघातक हल्ला

हिवरखेड (जि. अकोला) - जिल्ह्यातील हिवरखेड येथे एका दिव्यांग दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला झाला असून, जोडप्यातील दिव्यांग पत्नी जागीच ठार झाली. दिव्यांग पती गंभीर जखमी असून, हिवरखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून अकोला येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. हे भीषण हत्याकांड कौटुंबिक वादातून झाल्याचे बोलले जाते.

घटनेनंतर आंधळ्या मुलाची आई आणि मोठा भाऊ घरून तेल्हाराच्या दिशेने ऑटोने फरार झाले होते. याची माहिती हिवरखेड पोलिसांनी कळविल्यावर तेल्हारा पोलिस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड आणि राजू उर्फ गजानन इंगळे, आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फरार झालेल्या दोन्ही आई मुलांना ताब्यात घेतले. हिवरखेड पोलिसांच्या स्वाधीन केले. हिवरखेड येथे पुढील तपास ठाणेदार विजय चव्हाण आणि त्यांचे सहकारी करीत आहेत. मृतक महिलेचे नाव सत्यभामा शांताराम कंडारे (२८) व गंभीर जखमी युवकाचे नाव शांताराम कंडारे (३०) आहे.

घटनास्थळी अकोल्याचे मोबाईल फॉरेन्सिक इन्वेस्टीगेशन टीम दाखल झाली. बारकाईने घटनास्थळाचे आणि मृतदेहाचे पाहणी सुरू आहे. याप्रकरणी हिवरखेड व तेल्हारा पोलिसांनी तत्परता दाखविल्यामुळे आरोपींना वेळीच पकडण्यात यश आले. आरोपी भाऊ विनोद देविदास खंडारे (३३) तर आई पुष्पा देविदास खंडारे (५५) यांची हिवरखेड पोलिस कसून चौकशी करीत आहेत. यापैकी आरोपी विनोद कंडारे याने हत्तेची कबुली दिली असून, त्याच्यावर कलम ३०२,व ३०७ अन्वये गुन्हा दाखल करून, त्याला अटक करण्यात आली आहे.

Web Title: Blind Couple Assaulted By Brother Akola

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top