Success Story : दिव्यांगत्वावर मात करीत यशाला गवसणी; दृष्टिहीन मोहम्मद व मोईनचा प्रेरणादायी प्रवास
Inspiring Students : अकोल्यातील दृष्टिहीन मोहम्मद नाजिल व मोईन खान या दोन विद्यार्थ्यांनी ब्रेल लिपी, वाचक-लेखनिक आणि ध्वनिमुद्रित साहाय्याच्या माध्यमातून प्रथम श्रेणीत बारावी परीक्षा उत्तीर्ण केली. दिव्यांगत्वावर मात करत त्यांनी जिद्द आणि आत्मविश्वासाचे अनोखे उदाहरण समाजासमोर ठेवले.
अकोला : दृष्टी नसली तरी दृष्टिकोन स्पष्ट होता. अडथळे आलेत पण ते थांबले नाहीत. अकोल्यातील मोहम्मद नाजिल आणि मोईन खान या दोन दिव्यांग विद्यार्थ्यांनी जिद्दीच्या जोरावर बारावीच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत यश संपादन करत इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे.