Sindkhed Raja : सिंदखेड राजा येथे घरकुल हप्ता मिळण्यासाठी रक्ताने लिहिले निवेदन ; नगर पालिकेवर नागरिकांचा मोर्चा

घरकुलाचे नियमित हप्ते मिळाले नसल्याने संतप्त घरकुल लाभार्थीनी नगर पालिका कार्यालयावर मोर्चा
blood letter for gharkul instalment pm awas scheme citizen protest at municipal office
blood letter for gharkul instalment pm awas scheme citizen protest at municipal office sakal
Updated on

सिंदखेड राजा : सिंदखेड राजा शहरांतील पंतप्रधान आवास योजेंनतर्गत शहरात अनेक घरकुले बांधली गेली तर अनेक घरकुले प्रगती पथावर आहेत मात्र,शेकडो घरकुल लाभार्थीना अद्याप घरकुलाचे नियमित हप्ते मिळाले नसल्याने संतप्त घरकुल लाभार्थीनी नगर पालिका कार्यालयावर मोर्चा काढला.घरकुलाचे निवेदन नागरिकांनी स्वतःच्या रक्ताने लिहिले आहे.

त्यामुळे आंदोलनाची सर्वत्र चर्चा पहायला मिळत आहे.गेल्या तीन महिन्यात हा दुसरा मोठा मोर्चा आहे. घरकुलाचे हप्ते वर्ष उलटूनही मिळत नसल्याने संतप्त घरकुल लाभार्थी राजवाडा येथून नगर पलिकेपर्यंत आले.

राहिलेले हप्ते त्वरीत मिळावे यासाठी अनेक लाभार्थीना रक्ताने निवेदन तयार करून ते पालिका अधिकाऱ्यांना देण्यात आले. सध्या पेरणीची कामे सुरू आहेत बियाणे,औषधी खर्च,शाळांमधे मुलांचे प्रवेश,त्यांची पुस्तके,साहित्य आदींसाठी लागणाऱ्या पैसा जोडताना सामान्य नागरिकांची अडचण होत आहे

blood letter for gharkul instalment pm awas scheme citizen protest at municipal office
Sindkhed Raja News : मातृतीर्थ सिंदखेड राजा विकास आराखड्याला मिळणार चालना; डॉ राजेंद्र शिंगणे

त्यातच घरकुलाचे हप्ते लांबल्याने शहरातील शेकडो घरांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.हप्ते त्वरित मिळावे यासाठी याही पेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते कैलास नारायण मेहेत्रे,शाम मेहेत्रे,लक्ष्मण ढवळे,छगन काळे,अरुण जोगी,जगन्नाथ जोगी,बाबासाहेब जाधव,कैलास सातपुते,सखाराम असोलकर,संजय पाठक,संदीप तायडे यांच्यासह महिला,पुरुष लाभार्थींची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.