esakal | ‘त्या’ दोघांसाठी फोटोशूट ठरला शेवटचा; जेसीबी व दुचाकीच्या अपघातात ठार
sakal

बोलून बातमी शोधा

दोघांसाठी फोटोशूट ठरला शेवटचा; जेसीबी व दुचाकीच्या अपघातात ठार

दोघांसाठी फोटोशूट ठरला शेवटचा; जेसीबी व दुचाकीच्या अपघातात ठार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिखली (जि. बुलडाणा) : येथील एमआयडीसी परिसरात फोटोशूट करून चिखलीकडे परत येत असताना झालेल्या अपघातात एका युवकाचा जागीच, तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. २०) चिखली ते खामगाव मार्गावरील रेणुका पेट्रोलपंपासमोर घडली. (Buldana-Accident-News-Two-young-boy-killed-Crime-News-nad86)

शहरातील एमआयडीसी परिसरात फोटोशूट करण्यासाठी शे. दानिश शे. बिबन उर्फ मोनु (वय १८), फिरोज खान सलीम खान (१७) व सातगाव भुसारी येथील रोहित प्रदीप कंकाळ (१९) हे तिघे पल्सर दुचाकीने शहराबाहेर गेले होते. शहरात परतताना चिखली-देऊळगावराजा महामार्गावरीवरील रेणुका पेट्रोल पंपासमोर रस्ता ओलांडणाऱ्या जेसीबीने त्यांच्या दुचाकीला जबर धडक बसली. त्यामध्ये दुचाकीचालक शेख दानिश (रा. हिदायतनगर, माळीपुरा चिखली) याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर फिरोज व रोहित गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान फिरोजचाही मृत्यू झाला. रोहितवर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा: सत्तांतरानंतर प्रश्न रखडला; पाच एव्हरेस्टवीर नोकरीच्या प्रतीक्षेत

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

संग्रामपूर तालुक्यातील ग्राम नवीन भोन येथील अल्पवयीन मुलगी शेतातील धुऱ्यावरून जात असताना दोघांनी वाईट उद्देशाने तिचा हात धरून विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी तामगाव पोलिसात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोघेही आरोपी फरार आहेत. तालुक्यातील भोन नवीन येथील अल्पवयीन मुलीच्या वडिलांचे व आरोपीचे शेत शेजारी असून अल्पवयीन मुलगी शेतात काम करीत असलेल्या आईसाठी जेवणाचा डबा धुऱ्यावरून घेऊत जात असताना दोन आरोपींनी वाईट उद्देशाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला.

(Buldana-Accident-News-Two-young-boy-killed-Crime-News-nad86)

loading image