शेगाव पायी दिंडी सोहळा रद्द, श्री गजानन महाराज संस्थानचा निर्णय

मुशीरखान कोटकर
Saturday, 2 January 2021

धार्मिक उत्सवाला प्रेरणा आणि योग्य दिशा देणारेही अनेक धार्मिक संस्थान महाराष्ट्र राज्यात कार्यरत आहे. वारकरी परंपरा कायम ठेवत देऊळगाव राजा ते शेगांव पायी दिंडी सोहळ्याचे दरवर्षी पाच वर्षापासुन नियोजन केल्या जात आहे.

देऊळगाव राजा (जि.बुलडाणा) :  धार्मिकतेची परंपरा जोपसण्यात अनेक धार्मिक स्थळांचे ही मोठे योगदान आहे त्यात अनेक साधु-संतानी महाराष्ट्राच्या मातीला दाखवलेली वारकरी संप्रदायाची परंपरा आधुनिक युगात पुढे नेण्यात ही राज्यातील वारकरी मागे नाहीत.

धार्मिक उत्सवाला प्रेरणा आणि योग्य दिशा देणारेही अनेक धार्मिक संस्थान महाराष्ट्र राज्यात कार्यरत आहे. वारकरी परंपरा कायम ठेवत देऊळगाव राजा ते शेगांव पायी दिंडी सोहळ्याचे दरवर्षी पाच वर्षापासुन नियोजन केल्या जात आहे.

हेही वाचा -  Success Story:दोन एकरात तयार केला संपूर्ण विषमुक्त ‘आहार’, २३ प्रकारच्या भाजीपाला पिकातून अडीच लाखांचे उत्पन्न

मात्र यावर्षी संपुर्ण जगात कोरोना सारख्या जागतिक संसर्गजन्य रोगाने थैमान घातल्याने आपले शक्तीस्थळ असलेले धार्मिक देवस्थानही शासनाच्या आदेशाने बंद होती ती आता शासनाच्या नियमाप्रमाणे हळुहळु उघडली आहे.

त्यांना शासनाने अनेक नियमांचे निर्बंध घालुन दिले असुन आपला दरवर्षी शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करून होणारा दिंडी सोहळा यावर्षी नागरीकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात असल्याने आणि श्री संत गजानन महाराज संस्थान आग्रही मागणीमुळे  रद्द करण्याचा निर्णय आमच्या दिंडी सोहळ्याच्या विश्वस्त मंडळाने घेतला असल्याचे एका परिपत्रकाद्वारे करण्यात आली

हेही वाचा -  अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

दरवर्षी प्रमाणे ७ जानेवारी रोजी सुर्यास्त होताच शहरातील श्री संत सावता महाराज मंदिर येथुन निघणारा पाच दिवसाचा भक्तीमय पालखी सोहळा ११ जानेवारीला  श्रींच्या पावन नगरीत पोहचत असतो. यावर्षी कोरोनाच्या पाद्रुर्भाव असल्याने हा सोहळा रद्द करत असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

 

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Buldana Marathi News Shegaon Pai Dindi ceremony canceled, decision of Shri Gajanan Maharaj Sansthan