esakal | Success Story:दोन एकरात तयार केला संपूर्ण विषमुक्त ‘आहार’, २३ प्रकारच्या भाजीपाला पिकातून अडीच लाखांचे उत्पन्न
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News Success Story Complete non-toxic diet created in two acres, yield of Rs. 2.5 lakhs from 23 types of vegetables

रसायनांच्या भडीमारातून उत्पादीत होणाऱ्या भाजीपाला, धान्य पिकामुळे मानसाचे जीवन धोक्यात सापडले आहे. या विषयुक्त आहारातून समाजाला काढण्यासाठी कोणीतरी पाऊल उचलणे अत्यावश्‍यक आहे. या जाणीवेतून कान्हेरी सरप येथील एका उच्चशिक्षित तरूणाने ही सामाजिक दायित्वाची जबाबदारी स्वीकारली आहे.

Success Story:दोन एकरात तयार केला संपूर्ण विषमुक्त ‘आहार’, २३ प्रकारच्या भाजीपाला पिकातून अडीच लाखांचे उत्पन्न

sakal_logo
By
अनुप ताले

अकोला:  रसायनांच्या भडीमारातून उत्पादीत होणाऱ्या भाजीपाला, धान्य पिकामुळे मानसाचे जीवन धोक्यात सापडले आहे. या विषयुक्त आहारातून समाजाला काढण्यासाठी कोणीतरी पाऊल उचलणे अत्यावश्‍यक आहे. या जाणीवेतून कान्हेरी सरप येथील एका उच्चशिक्षित तरूणाने ही सामाजिक दायित्वाची जबाबदारी स्वीकारली आहे.

त्यांनी केवळ दोन एकरात २३ प्रकारचे सेंद्रिय भाजीपाला पीक उत्पादन घेण्याची किमया करून दाखविली असून, त्यातून वर्षाल अडीच लाख रुपये निव्वळ उत्पन्न सुद्धा मिळविले आहे.

हेही वाचा - हे तर नवलंच! सातपुड्यातील ‘तेल्यादेवाला’ लागते तंबाखू, बिडी आणि सिगारेटही, जाणून घ्या रंजक कहाणी

बार्शीटाकळी तालुक्यात कान्हेरी सरप येथील योगेश मधुकरराव सरप हे पी.एच.डी. प्राप्त उच्चशिक्षित तरूण असून त्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरली आहे. २००२ पासून ते सेंद्रिय पद्धतीने शेती करीत असून, सर्वप्रथम त्यांनी जमिनीचे प्रमाणीकरण केले.

त्यानंतर शेतातून निघाणारे हिरवे गवत, काडीकचरा यापासून कंपोस्ट खत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, गोमुत्रापासून जीवामृत घरी तयार करून त्याचा शेतात सातत्याने ते वापर करीत आहेत. देशी गाईंपासून मिळणाऱ्या शेणखताचा ते सेंद्रिय खत म्हणून योग्य उपयोग करीत आहेत. भाजीपाला पीक उत्पादनासोबतच खरिपात ते सेंद्रिय मूग, उडीद, तूर व विविध धान्य पिकांची लागवड करतात व त्यापासून स्वतः डाळ तयार करून विक्री करतात. रब्बीमध्ये हरभरा, अश्‍वगंधा, सोप, बन्सी गहू, मोहरीचे सुद्धा उत्पादन ते घेतात.

हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

दोन एकरात २३ भाजीपाला पिके
योगेश सरप हे केवळ दोन एकरात हळद, अद्रक, वांगी, मिरची, पालक, सांभार, फुलकोबी, पत्ताकोबी, टमाटे, बरबटी, भेंडी, गवार, निंबु, लसून, दुधीभोपळा, भरताची वांगी, शेफु, आंबळचूका, दोडके, कारली, गाजर, सुरणकंध, कवळे या २३ प्रकारच्या सेंद्रिय भाजीपाला पिकांचे उत्पादन घेत आहेत.

शेतकरी ते ग्राहक विणले जाळे
अकोल्यात हप्त्यातून तीन दिवस भाजीपाला व धान्य विक्री केंद्र योगेश सरप यांनी सुरू केले असून, त्या माध्यमातून शेतकरी ते थेट ग्राहकाच्या घरापर्यंत शेतमाल विक्री ते करत आहेत. त्यातून हप्त्याला सहा ते सात हजार, महिन्याला २८ हजार व वर्षाला अडीच लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळत असल्याचे ते सागतात.

हेही वाचा - अलास्का, युरोप, अफ्रिकेमधुन आले विदेशी पाहुणे

विषमुक्त वायू, जल, अन्न, बुद्धी यात खरी ग्राम समृद्धी आहे. त्यासाठी केवळ सेंद्रिय पद्धतीतून आम्ही शेती उत्पादन घेत आहोत. दोन एकरात २३ हून अधिक सेंद्रिय भाजीपाला पिके व दोन एकरात सेंद्रिय धान्य पिके घेत आहोत. धान्याची ग्रेडींग, पॅकिंग, ब्रॅंडिंग करून विक्री सुद्धा करीत आहे. शेतकरी ते थेट ग्राहक विक्री मी स्वतः करतो. एक गट तयार करून वेगवेगळे भाजीपाला लावून गट सक्षम करणे हे उद्दीष्ट आहे.
- योगेश सरप, शेतकरी, कान्हेरी सरप

(संपादन - विवेक मेतकर)

loading image
go to top