esakal | तिबार पेरणीसाठी सरपंच महिलेनेच हाती घेतली तिफन !
sakal

बोलून बातमी शोधा

buldana Sarpanch woman takes Tifan for Tibar sowing!

दोनवेळा पेरलेले सोयाबीन उगवलेच नसल्याने मेहकर तालुक्‍यामधील गट ग्रामपंचायत गवंढाळा- कंबरखेड च्या महिला सरपंच ताई गजानन जाधव यांनी तिसऱ्यांदा पेरणीसाठी स्वत:हा आपल्या शेतात तिफन धरली.

तिबार पेरणीसाठी सरपंच महिलेनेच हाती घेतली तिफन !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

घाटबोरी (जि. बुलडाणा) : दोनवेळा पेरलेले सोयाबीन उगवलेच नसल्याने मेहकर तालुक्‍यामधील गट ग्रामपंचायत गवंढाळा- कंबरखेड च्या महिला सरपंच ताई गजानन जाधव यांनी तिसऱ्यांदा पेरणीसाठी स्वत:हा आपल्या शेतात तिफन धरली.


बोगस बियाणे शेतात उगवलेच नसल्याने कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करतात व शेतकऱ्यांना आश्वासन देतात की लवकरच मदत मिळुन देऊ,पण आज रोजी पाऊस समाधान कारक असला तरी शेतकऱ्यांनाजवळ दुबार-तिबार पेरणी साठी पैसा नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त अवस्थेत आहे. आपल्या शेतात तिबार पेरणी करताना दिसत असून स्वतः:हा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पेरणीची तिफन हाकलत आहेत. महिला सरपंच ताई जाधव यांचा आदर्श इतर महिलांनी घेतल्यास वावगे ठरणार नाही. बोगस कंपन्यांवर आळा घालण्यासाठी शासन-प्रशासन यांनी कठोर पाऊल उचलून, कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावा, मागणी होत आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा
बोगस बियाणे शेतात पेरलेले उगवलेच नसल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. आमच्या गावातसुद्धा बोगस बियाणे उगवलेच नाही. आमच्या शेतात सुद्धा तिबार पेरणीची पाळी आल्यामुळे शासन-प्रशासन यांचे लक्ष वेधण्यासाठी मी पेरणीची तिफन हाकलत आहे. आतातरी बोगस कंपन्यांवर आळा घालून शेतकऱ्यास मदत करावी.
- ताई गजानन जाधव,सरपंच, गवंढाळा ग्रामपंचायत