Buldhana: तलाठ्यास लोटपोट करून गाडी खाली घेण्याची धमकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

बुलडाणा : तलाठ्यास लोटपोट करून गाडी खाली घेण्याची धमकी

देऊळगाव राजा (जि. बुलडाणा) : बेकायदेशीर वाळूचे ट्रॅक्टर कारवाईसाठी पोलीस ठाण्यात घेऊन चला म्हणून सांगणाऱ्या तलाठी व मंडळ अधिकाऱ्यास लोटपोट करून जीवे मारण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी ट्रॅक्टर चालकासह दोघांविरुद्ध आज (ता. १६) पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

तालुक्यातील खडकपूर्णा नदी पात्रातील रेती घाट बंद असूनही सर्रास बेकायदेशीर रेतीचे उत्खनन सुरू आहे परिणामी शासनाच्या महसूलाला वाळू माफियांकडून लाखोंचा चुना लावण्यात येत आहे. डिग्रस येथील तलाठी ज्ञानेश्वर दांडगे,मंडळ अधिकारी प्रेमानंद वानखेडे व कोतवाल भगवान ढोले तिघेजण देऊळगाव मही ते डिग्रस मार्गावरील गॅस गोडाऊन जवळ थांबले असताना नारायणखेड मार्गाने एक लाल रंगाचा विना नंबर ट्रॅक्टर अवैध रेती भरून येताना दिसले.

हेही वाचा: अमरावती : जाळपोळ व तोडफोडीच्या घटनांमध्ये जवळपास ४० लाखांचे नुकसान

सदर ट्रॅक्टर अडवून ट्रॅक्टर चालक बाळू मुंडे यास पुढील कारवाईसाठी सदर ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात घेवून येण्याचे सांगितले असता गणेश विष्णू वाघ हा घटनास्थळी आला व ट्रॅक्टर चालकास धमकावून अवैध रेतीने भरलेले ट्रॅक्टर पळवून नेण्यास सांगितले व महसूल कर्मचाऱ्यांना लोटपोट करून शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर गाडीखाली उडवून देईल म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत तलाठी ज्ञानेश्वर हरी दांडगे हल्ली मुक्काम देऊळगाव मही यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गणेश विष्णू वाघ राहणार डिग्रस बुद्रुक व बाळू मुंढे राहणार नारायण खेड या दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करून अश्लील शिवीगाळ करीत लोटपोट केल्याबद्दल पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे पाटील तपास करीत आहे.

loading image
go to top