बुलढाणा : ॲप डाऊनलोड करून घेऊन ऑनलाइन फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

online fraud

बुलढाणा : ॲप डाऊनलोड करून घेऊन ऑनलाइन फसवणूक

बुलढाणा (देऊळगाव राजा) : तुमचे मोबाईल नंबर  २४ तासात ब्लॉक होणार असून एक विशिष्ट ॲप डाऊनलोड करून घेण्याचे सांगून एका भामट्याने शिक्षकाला ऑनलाईन ७४ हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली असून पोलिसांनी शिक्षकाच्या फिर्यादीवरून अज्ञात भामट्या विरुद्ध ऑनलाइन फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार शहरातील सिविल कॉलनी येथील महेश गोपाळ अहिरे हे जाफराबाद तालुक्यातील डावरगाव देवी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हजर असताना त्यांना अज्ञात व्यक्तीचा त्यांच्या मोबाईल नंबर वर कॉल आला की तुमचे सिम कार्ड २४ तासात ब्लॉक होईल म्हणून केवायसी करण्यासाठी एक मेसेज पाठवतो त्यावर दहा रुपये रिचार्ज करा व कॅब एनीडेक्स नावाचे ॲप डाऊनलोड करण्याचे सांगितले.

सदर ॲप डाऊनलोड केल्यानंतर अज्ञात भामट्याने त्यांचे एटीएम कार्ड हॅक करून त्यातून प्रथम ४९ हजार ५५ रुपये नंतर ते २३ हजार ९४४ व ९९९ असा एकूण ७४ हजार रुपये ऑनलाइन काढून घेतले फिर्यादी शिक्षकाच्या मोबाईल वर रक्कम कपातीचे मेसेज आल्यावर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले व त्यांनी लगेच आपले एटीएम कार्ड स्वाईप केले.

मात्र, तोपर्यंत अज्ञात भामट्याने त्यांना ऑनलाइन ७४ हजार रुपयाचा गंडा घातला होता सदर फसवणुकीच्या संदर्भात महेश गोपाळ अहिरे वय ४७ राहणार सिविल कॉलनी यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात भामट्या विरुद्ध ऑनलाइन फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे सदर प्रकरणात ठाणेदार जयवंत रघुनाथ सातव स्वतः तपास करीत आहेत

हेही वाचा: मि. ५६ इंच घाबरलेत! चीनबाबत परस्परविरोधी दाव्यांवरून राहुल गांधींची टीका

ऑनलाइन फसवणुकी चे विविध फंडे वापरून अनेक भामटे भ्रमणध्वनीवर कॉल करून फसवणूक करण्यासाठी ऑनलाइन सक्रिय असतात नागरिकांनी ऑनलाइन आलेल्या कॉल विषयी सतर्क राहून खातरजमा करावी ॲप डाऊनलोड करताना दक्षता बाळगावी व कुठल्याही सूचनेचे विचारपूर्वक अनुकरण करून स्वतःला ऑनलाइन फसवणूकी पासून वाचवावे असे आवाहन ठाणेदार जयवंत सातव यांनी केले आहे.

loading image
go to top