बुलढाणा - आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू | ST Workers Strike | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुलढाणा - आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनिकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा ११ दिवसांपासून संप सुरु आहे. अद्याप यावर तोडगा निघालेला नाही.

बुलढाणा - आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

sakal_logo
By
टीम ई सकाळ

राज्य परिवहन मंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा मागील ११ दिवसापासून संप सुरू आहे. संप चिघळत असल्यामुळे काही कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. तसंच काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्नसुद्धा केला आहे. १६ नोव्हेंबरला आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या विशाल प्रकाश अंबलकार या कर्मचाऱ्याचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

खामगाव आगारातील सहाय्यक मॅकेनिक विशाल प्रकाश अंबलकार ( २९ ) रा. माटरगाव यांनी राज्य शासनाच्या धोरणाचा निषेध करीत १६ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास राहत्या घरी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना त्वरित सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच मनसे उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार यांनी सामान्य रुग्णालयात जाऊन अंबलकार यांची भेट घेतली होती. प्रकृती बिघडल्यामुळे पुढील उपचारासाठी अकोल्याला पाठविले होते मात्र तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हेही वाचा: कोल्हापुरात पुन्हा 'आमचं ठरलंय'ची सोशल मीडियावर चर्चा

अंबलकार यांनी निलंबनाच्या कारवाईच्या भीतीने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे समजते. एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या वाढत असून आता राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून केली जात आहे.

loading image
go to top